Join us

Faf Du Plessis MS Dhoni, IPL 2022: CSKच्या धोनीला मैदानावर पाहताच RCBचा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने मारली मिठी (Viral Photos)

डू प्लेसिसचा गेल्या वर्षी CSKच्या विजयात मोठा वाटा होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 14:36 IST

Open in App

Faf Du Plessis MS Dhoni, IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचे खेळाडू IPL 2022 च्या पूर्वसंध्येला मुंबईत प्रक्टीस कँपमध्ये एकमेकांना भेटले. RCB आणि CSK दोन्ही संघाचे माजी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी भेट घेत गप्पा मारल्या. पण सर्वाधिक चर्चा झाली ती RCBचा नवा कोरा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने धोनीला मारलेल्या मिठीची. गेल्या हंगामापर्यंत CSKकडून खेळणाऱ्या डू प्लेसिसचे मिठी मारताना फोटो चांगलेच व्हायरल झाले.

फाफ डू प्लेसिसने मैदानात धोनीला पाहताच त्या त्याची गळाभेट घेतली. त्याची चौकशी केली तसेच त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. इतकेच नव्हे तर CSKचे इतर सहकारी आणि स्टाफ सदस्य यांच्याशीदेखील त्याने खूप धमाल मस्ती केली. डू प्लेसिसने सर्वांसोबत छान वेळ घालवला. या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. CSK च्या अधिकृत हँडलने सोशल मीडियावर काही हृदयस्पर्शी छायाचित्रे शेअर केली. त्यात त्यांनी कॅप्शन लिहिलं की, काही भेटी या आजही आमच्या मनाला सुखावून जातात.

२०१२ पासून ८ हंगामात चार वेळा चॅम्पियन झालेल्या CSKचे प्रतिनिधित्व डू प्लेसिस मागच्या वर्षापर्यंत करत होता. त्याला मेगा लिलावात कोहलीच्या RCB ने विकत घेत कर्णधार म्हणून घोषित केले. केवळ फ्रँचायझीसाठीच नाही, तर सीएसके चाहत्यांसाठीही एका खेळाडूची ही खूप भावनिक 'एक्झिट' होती. त्यामुळेच या फोटोंमुळे CSKचे सर्वच चाहते सुखावले.

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App