Sanju Samson IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : संजू सॅमसनचा 'हल्ला बोल'!; उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्याही झाला अवाक्, Video  

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात स्थान न मिळाल्याचा सर्व राग आज संजू सॅमसन ( Sanju Samson) काढताना दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 08:14 PM2022-05-24T20:14:39+5:302022-05-24T20:18:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Sanju Samson completes 400 runs in IPL 2022 at 150+ Strike Rate, Sanju Samson's elegant SIX, Video   | Sanju Samson IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : संजू सॅमसनचा 'हल्ला बोल'!; उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्याही झाला अवाक्, Video  

Sanju Samson IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : संजू सॅमसनचा 'हल्ला बोल'!; उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्याही झाला अवाक्, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात स्थान न मिळाल्याचा सर्व राग आज संजू सॅमसन ( Sanju Samson) काढताना दिसला. राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जैस्वाल दुसऱ्याच षटकात माघारी परतल्यानंतर कर्णधार सॅमसनने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याचे उत्तुंग षटकार पाहून GT कर्णधार हार्दिक पांड्याही अवाक् झाला... संजूने आयपीएल २०२२मध्ये १५०+ च्या स्ट्राईक रेटमध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडला. 


कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा पहिला क्वालिफायर सामना सुरू आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  अल्झारी जोसेफ याचे ल्युकी फर्ग्युसनच्या जागी संघात पुनरागमन झाले आहे. राजस्थानच्या संघात बदल झालेला नाही. संजू स‌ॅमसनने आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक १३ टॉस गमावले आणि एका पर्वात सर्वाधिक नाणेफेक गमावण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी २०१२ मध्ये महेंद्रसिंग धोनीने १२ टॉस  गमावले होते.  ( पाहा IPL 2022 - Qualifier 1 GT vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

जोस  बटलरने दोन कव्हर ड्राईव्ह फोर मारल्यानंतर राजस्थानचे चाहते खूष झाले होते, परंतु यश दयाने दुसऱ्यच षटात सलामवीर यशस्वी जैस्वालला ( ३ ) बाद केले. चेंडू बॅटची किनार घेत यष्टिरक्षक वृद्धीमान सहाच्या हाती विसावला अन् जोरदार अपील झाले. मैदानावरील अम्पायरने नाबाद दिले होते, परंतु यशस्वीने खिलाडूवृत्ती दाखवून स्वतः माघारी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अम्पायरने आऊट असल्याचा बोट उचलला. संजू सॅमसनने उभ्या उभ्या सिक्स खेचून त्याचे खाते उघडले. पण, गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या धावगतीवर लगाम लावली होती.

मोहम्मद शमीने टाकलेल्या पाचव्या षटकात सॅमसनचा झेल उडाला होता अन् मॅथ्यू वेडने तो टिपण्यासाठी सुरेख डाईव्हही मारली, परंतु त्याची उडी तोकडी पडली. सॅमसनचे खणखणीत षटकार पाहून हार्दिक पांड्याही अवाक् झाला. राजस्थानने ६ षटकांत १ बाद ५५ धावा केल्या आणि त्यातील ३० धावा या संजूच्याच होत्या. सॅमसनने आजच्या सामन्यात राजस्थानकडून ३०००+ धावांचा टप्पाही ओलांडला. अजिंक्य रहाणेनंतर ( ३०९८) असा पराक्रम करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.

 


 
गुजरात टायटन्स - वृद्धीमान सहा, शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी ( Gujarat Titans Playing XI: Wriddhiman Saha(w), Shubman Gill, Matthew Wade, Hardik Pandya(c), David Miller, Rahul Tewatia, Rashid Khan, Ravisrinivasan Sai Kishore, Yash Dayal, Alzarri Joseph, Mohammed Shami)

राजस्थान रॉयल्स  - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, शिमरोन हेटमायर, रियान पराग, प्रसिद्ध कृष्ण, युजवेंद्र चहल, ओबेड मॅकॉय ( Rajasthan Royals Playing XI: Yashasvi Jaiswal, Jos Buttler, Sanju Samson(w/c), Devdutt Padikkal, Ravichandran Ashwin, Shimron Hetmyer, Riyan Parag, Trent Boult, Prasidh Krishna, Yuzvendra Chahal, Obed McCoy) 

Web Title: IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Sanju Samson completes 400 runs in IPL 2022 at 150+ Strike Rate, Sanju Samson's elegant SIX, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.