Join us  

IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : गुजरात टायटन्सने 'टॉस' जिंकला, पण राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने MS Dhoniचा विक्रम मोडला

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 7:19 PM

Open in App

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. आयपीएलमध्ये पदार्पणातच गुजरात टायटन्सने दमदार कामगिरी करून सर्वाधिक २० गुणांसह क्वालिफायर १  मधील जागा पक्की केली. राजस्थान रॉयल्सनेही २००८नंतर प्रथमच टॉप टू मध्ये स्थान पटकावले आहे. त्यांनी १८ गुणांसह दुसरे स्थान पक्के केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने कमाल करून दाखवली आहे आणि आज त्याला संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानला नमवून अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. 

पण, गुजरात-राजस्थान यांच्या लढतीवर पावसाचे सावट आहे. आजच्या सामन्यात ३५ ते ५१% पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर निर्धारित षटकांचा सामना झाला नाही, तर सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल. तेही न झाल्यास साखळी फेरीतील कामगिरीच्या जोरावर विजेता ठरेल. म्हणजेच २० गुण पटकावणारा गुजरात टायटन्स संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  अल्झारी जोसेफ याचे ल्युकी फर्ग्युसनच्या जागी संघात पुनरागमन झाले आहे. राजस्थानच्या संघात बदल झालेला नाही. 

संजू स‌ॅमसनने आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक १३ टॉस गमावले आणि एका पर्वात सर्वाधिक नाणेफेक गमावण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी २०१२ मध्ये महेंद्रसिंग धोनीने १२ टॉस  गमावले होते. 

गुजरात टायटन्स - वृद्धीमान सहा, शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी ( Gujarat Titans Playing XI: Wriddhiman Saha(w), Shubman Gill, Matthew Wade, Hardik Pandya(c), David Miller, Rahul Tewatia, Rashid Khan, Ravisrinivasan Sai Kishore, Yash Dayal, Alzarri Joseph, Mohammed Shami)

राजस्थान रॉयल्स  - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, शिमरोन हेटमायर, रियान पराग, प्रसिद्ध कृष्ण, युजवेंद्र चहल, ओबेड मॅकॉय ( Rajasthan Royals Playing XI: Yashasvi Jaiswal, Jos Buttler, Sanju Samson(w/c), Devdutt Padikkal, Ravichandran Ashwin, Shimron Hetmyer, Riyan Parag, Trent Boult, Prasidh Krishna, Yuzvendra Chahal, Obed McCoy) 

टॅग्स :आयपीएल २०२२राजस्थान रॉयल्ससंजू सॅमसनगुजरात टायटन्समहेंद्रसिंग धोनी
Open in App