IPL 2022: गुजरातच्या वेगवान माऱ्यापुढे पंजाबच्या फलंदाजांची परीक्षा, आज होणार कांटे की टक्कर

IPL 2022: आयपीएलमध्ये आज गुजरात आणि पंजाब किंग्सच्या संघांमध्ये सामना रंगणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 05:24 IST2022-04-08T05:23:57+5:302022-04-08T05:24:41+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2022: Punjab batsmen's test ahead of Gujarat's fast bowlers, today will be a fork in the road | IPL 2022: गुजरातच्या वेगवान माऱ्यापुढे पंजाबच्या फलंदाजांची परीक्षा, आज होणार कांटे की टक्कर

IPL 2022: गुजरातच्या वेगवान माऱ्यापुढे पंजाबच्या फलंदाजांची परीक्षा, आज होणार कांटे की टक्कर

पंजाब किंग्स
- पॉवर प्लेमध्ये तडाखेबंद फलंदाजी. लियॉम लिव्हिंगस्टोन मोठी फटकेबाजी करू शकतो. अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार मयांक अग्रवाल यांनी आतापर्यंत मोलाचे योगदान दिलेले नाही. मधल्या फळीत जितेश शर्माकडून तर डेथ ओव्हरमध्ये  शाहरुख खान आणि ओडियन स्मिथकडून धावांची अपेक्षा.
- गोलंदाजीत कॅगिसो रबाडा आणि लेगस्पिनर राहुल चाहर हे मॅचविनर  असून, अर्शदीप सिंग, वैभव अरोरा, लिव्हिंगस्टोन उपयुक्त कामगिरी करू शकतात.

गुजरात टायटन्स
- या संघाची कमकुवत बाजू त्यांची फलंदाजी आहे.  शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पांड्या  यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज धावा काढू शकले नाहीत. विजय शंकर आणि मॅथ्यू वेड यांनी निराश केले तर राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर कामगिरीत सातत्य राखू शकले नाहीत.
- गोलंदाजीत मोहम्मद शमी, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, अभिनव सदारंगानी, राहुल तेवतिया, जयंत यादव, अल्जारी जोसेफ यांच्याकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे.

Web Title: IPL 2022: Punjab batsmen's test ahead of Gujarat's fast bowlers, today will be a fork in the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.