Join us

IPL 2022 playoffs scenarios : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मोठ्या विजयासह नेट रन रेट बराच सुधारला, पण प्ले ऑफच्या शर्यतीचं काय? 

IPL 2022 playoffs scenarios : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) ग्रीन जर्सीत खेळ अधिक बहरतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 20:32 IST

Open in App

IPL 2022 playoffs scenarios : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) ग्रीन जर्सीत खेळ अधिक बहरतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. प्ले ऑफच्या शर्यतीत काम राहण्यासाठी RCB व सनरायझर्स हैदराबाद ( SRH) यांच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. पण, आज फॅफ ड्यू प्लेसिसच्या RCB ने बाजी मारली आणि ६७ धावांनी सामना जिंकला. या विजयामुळे RCBने त्यांचा नेट रन रेट -०.४४४ वरून - ०.११५ इतका कमी केला, परंतु प्ले ऑफच्या शर्यतीचं काय?

विराट भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर फ‌फ व रजत यांनी १०५ धावांची भागीदारी केली. रजत ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४८ धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल बसरला आणि त्याने २४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३३ धावा चोपल्या. फॅफ एका बाजूने दमदार खेळत होताच.. त्यानेही ५० चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. पण, या सर्वांत कार्तिक उजवा ठरला. त्याने अवघ्या ८ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ३० धावा केल्या. यापैकी २२ धावा त्याने अखेरच्या षटकात चोपल्या. राहुल त्रिपाठीने झेल सोडल्यानंतर कार्तिक सुसाट सुटला.  

प्रत्युत्तरात केन विलियम्सनही डायमंड डकवर रन आऊट झाला. अभिषेक शर्माही भोपळ्यावर बाद झाला. हैदराबादचे दोन्ही सलामीवीर १ धावेवर माघारी परतले. पण, राहुल त्रिपाठी ( ५८) व एडन मार्कराम ( २१) यांनी डाव सावरला. निकोलस पूरन ( १९) ठिकठाक खेळला. पण, हैदराबादच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. वनिंदू हसरंगाने १८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड २, ग्लेन मॅक्सवेल व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. 

काय सांगतं प्ले ऑफचं गणित?

  • लखनौ सुपर जायंट्स - ११ सामन्यांत १६ गुण
  • गुजरात टायटन्स - ११ सामन्यांत १६ गुण
  • राजस्थान रॉयल्स - ११ सामन्यांत १४ गुण
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुर - १२ सामन्यांत १४ गुण 

---

  • दिल्ली ‌क‌ॅपिटल्स - १० सामन्यांत १० गुण
  • सनरायझर्स हैदराबाद - ११ सामन्यांत १० गुण
  • पंजाब किंग्स - ११ सामन्यांत १० गुण

 

 सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स यांना आता प्ले ऑफमध्ये येण्यासाठी उर्वरित तीनही सामने जिंकावे लागणार आहेत. RCBने एक विजय मिळवल्यास त्यांचे स्थान पक्के होईल

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद
Open in App