Join us  

IPL 2022 playoffs scenarios : राजस्थान रॉयल्सच्या विजयाने Mumbai Indians ला मिळाला स्पर्धेबाहेर होण्याचा पहिला मान; आता पाहा कोणात शर्यत

IPL 2022 playoffs scenarios :  राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये शनिवारी पंजाब किंग्सवर ६ विकेट्स व २ चेंडू राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 7:50 PM

Open in App

IPL 2022 playoffs scenarios :  राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये शनिवारी पंजाब किंग्सवर ६ विकेट्स व २ चेंडू राखून विजय मिळवला. राजस्थानने या विजयासह आयपीएल २०२२च्या गुणतालिकेत ( points table) तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आणि पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे पर्वातील आव्हान अधिकृतरीत्या संपुष्टात आले. पंजाब किंग्सचे १९० धावांचे लक्ष्य राजस्थानने पार केले आणि १२ गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले.

जॉनी बेअरस्टो ( ५६), जितेश शर्मा ( ३८*), भानुका राजपक्षा ( २७) व लाएम लिव्हिंगस्टोन ( २२) यांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने ५ बाद १८९ धावा उभ्या केल्या. युझवेंद्र चहलने २८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आर अश्विन व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल व जोस बटलर यांनी दणक्यात सुरुवात केली. बटरल ३० धावांवर माघारी परतला, त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही २३ धावाच करू शकला. यशस्वी व देवदत्त पडिक्कल यांनी संघर्ष दाखवला. यशस्वीने ४१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६८ धावा केल्या. पडिक्कलही ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर शिमरोन हेटमायरने १६ चेंडूंत नाबाद ३१ धावा करून राजस्थानचा विजय पक्का केला.

गुणतालिकेतील क्रमवारीगुजरात टायटन्सने काल मुंबईविरुद्ध विजय मिळवला असता तर प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या संघाचा मान त्यांनी पटकावला असता. तरीही गुजरात १६ गुणांसह अव्वल स्थानी आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांत त्यांना एक विजय पुरेसा आहे. लखनौ सुपर जायंट्स  व राजस्थान रॉयल्स हे प्रत्येकी १४ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित आहे, फक्त एखादा चमत्कारच त्यांना रोखू शकतो. 

रॉयल च‌लेंजर्स बंगळुरू ( १२), दिल्ली कॅपिटल्स ( १०), सनरायझर्स हैदराबाद ( १०) व पंजाब किंग्स ( १०) हेही शर्यतीत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने आज लखनौला पराभूत केल्यास चेन्नई सुपर किंग्सचेही आव्हान संपुष्टात येईल. मुंबई इंडियन्स आता अन्य संघांचे समीकरण बिघडवण्याचे काम करू शकतात. 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सपंजाब किंग्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App