Join us  

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘बेबी एबी’ डेवाल्ड ब्रेविसची गर्लंफ्रेंड चर्चेत, समोर आले दोघांचे खास फोटो 

IPL 2022: Mumbai Indiansचा एक फलंदाज या हंगामात खूप चर्चेत आहे. त्याचं नाव आहे दक्षिण आफ्रिकन युवा फलंदाज David Bravis. दरम्यान, आता ब्रेविससोबत त्याची गर्लफ्रेंडसुद्धा सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 8:58 AM

Open in App

मुंबई - यंदाच्या IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. मुंबईला सलग चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. मात्र मुंबईचा एक खेळाडू या हंगामात खूप चर्चेत आहे. त्याचं नाव आहे दक्षिण आफ्रिकन युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत असलेल्या ब्रेविसने आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, आता ब्रेविससोबत त्याची गर्लफ्रेंडसुद्धा सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. 

ज्युनियर एबी डीव्हिलियर्स या नावाने प्रसिद्धीस आलेल्या डेवाल्ड ब्रेविसच्या गर्लफ्रेंडचं नाव लिंडी मारी असं आहे. लिंडी सोशल मीडिया सेंसेशन आहे. तिचे इन्स्टाग्रावर हजारो फॉलोअर्स आहेत. ब्रेविस गेल्या चार वर्षांपासून लिंडी हिला डेट करत आहे. दोघेही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रोमँटिक फोटो पोस्ट करत असतात.लिंडी मारीच्या सोशल मीडियावरील बहुतांश फोटोंमध्ये ती डेवाल्ड ब्रेविससोबतच दिसते. त्यामधून त्या दोघांचे प्रेम व्यक्त होत असते. लिंडी या फोटोंमध्ये खूप क्यूट दिसते.

डेवाल्ड ब्रेविसचा जन्म २९ एप्रिल २००३ रोजी जोहान्सबर्गमध्ये झाला होता. ब्रेविसला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होता. त्याने एबी डीव्हिलियर्सच्या मेंटरशिपखाली क्रिकेटचे धडे गिरवले. त्यामुळे डेवाल्डच्या खेळाचा स्तर खूप उंचावला आहे.डेवाल्ड ब्रेविस २० लाख रुपयांच्या बेस प्राईससह आयपीएलच्या लिलावात सहभागी झाला होता. त्याला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्समध्ये चुरस होती, अखेर मुंबई इंडियन्सने तब्बल ३ कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले.  डेवाल्ड ब्रेविसने कोलकाता नाईटरायडर्सविरुद्धच्या लढतीमधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

डेवाल्ड ब्रेविसने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या स्पर्धेमध्ये ब्रेविस सर्वाधिक धावा करणरा खेळाडू ठरला होता. त्याने सहा सामन्यांमध्ये ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा कुटल्या होत्या. त्यात दोन शतके आणि तीन अर्धशकतांचा समावेश होता.  

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल २०२२सेलिब्रिटीसोशल व्हायरल
Open in App