IPL 2022: Moeen Ali will be out of IPL : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( CSK vs KKR) यांच्यातल्या सामन्याने वानखेडे स्टेडियमवरून IPL 2022 ला सुरूवात होणार आहे. पण, CSK ची डोकेदुखी काही कमी झालेली नाही. १४ कोटींचा गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही आणि अष्टपैलू मोईन अली ( Moeen Ali) व्हिसा न मिळाल्याने अजूनही मुंबईत दाखल झालेला नाही. मोईन अली आज जर मुंबईत दाखल न झाल्यास, तो पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता मावळणार आहे.
- २६ मार्चला आहे पहिला सामना ( CSK vs KKR 1st match ) शनिवारी मोईन अली याला बुधवारी मुंबईत दाखल व्हावे लागणार आहे, त्यानंतर तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून तो पहिल्या सामन्यासाठी मैदानावर उतरू शकतो.
- प्रत्येक परदेशी खेळाडूला आयपीएल बायो बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.
- मोईन अलीच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवे याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळू शकते. मोईन अलीच नव्हे तर भारताला दीपक चहर व ड्वेन प्रेटोरियस या खेळाडूंशिवाय प्लेइंग इलेव्हन मैदानावर उतरवावी लागेल.
- मोईन अली - व्हिसा समस्या
- दीपक चहर - दुखापतग्रस्त
- ड्वेन प्रेटोरियस - बांगलादेशविरुद्धची मालिका
चेन्नई सुपर किंग्स Playing XI विरुद्ध KKR
ऋतुराज गायकवाड
डेव्हॉन कॉनवे
रॉबिन उथप्पा
अंबाती रायुडू
रवींद्र जडेजा
शिवम दुबे
ड्वेन ब्राव्हो
महेंद्रसिंग धोनी
ख्रिस जॉर्डन
अॅडम मिल्ने
प्रशांत सोलंकी
अपडेट्स- मोईन अली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे #CSK चे CEO काशी विश्वनाथ यांनी जाहीर केले. अद्याप त्याला व्हिसा मिळालेला नाही आणि तो कधी मिळेल, याबाबत अजूनही स्पष्टता मिळालेली नाही. #MoeenAli