Join us  

Arjun Tendulkar IPL 2022 MI vs SRH Live Updates : अर्जुन तेंडुलकर अखेरच्या साखळी सामन्यात खेळणार?; Mumbai Indians चा कॅप्टन रोहित शर्माने दिले संकेत 

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून मयांक मार्कंडे व संजय यादव यांना आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 7:31 PM

Open in App

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून मयांक मार्कंडे व संजय यादव यांना आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात प्रियांम गर्ग व फझलहक फारुकी यांना संधी मिळाली आहे. आज प्रियाम व अभिषेश शर्मा ओपनिंगला येणार आहे. मुंबई इंडियन्सचे ( MI ) स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. १२ सामन्यांत त्यांना केवळ तीन विजय मिळवता आलेला आहे आणि त्यामुळे आता उर्वरित दोन लढतीत त्यांच्याकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रयोग होताना दिसत आहेत. MIसाठी सामन्याचा निकाल महत्त्वाचा नसला तरी भविष्यातील वाटचालीसाठी युवा खेळाडूंची कामगिरी त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळेच लीगमध्ये बाकावर बसवून ठेवणाऱ्या खेळाडूंना आता संधी दिली जात आहे. ( पाहा IPL 2022 - MI vs SRH सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, प्रियाम गर्ग, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन, फझलहक फारुकी ( Sunrisers Hyderabad Playing XI: 1 Abhishek Sharma, 2 Priyam Garg, 3 Kane Williamson (capt), 4 Rahul Tripathi, 5 Aiden Markram, 6 Nicholas Pooran (wk), 7 Washington Sundar, 8 Bhuvneshwar Kumar, 9 Umran Malik, 10 T Natarajan, 11 Fazalhaq Farooqi)

मुंबई इंडियन्स - इशान किशन, रोहित शर्मा, त्रिस्तान स्टुब्ब्स, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, रमणदीप सिंग, संजय यादव, जसप्रीत बुमराह, मयांक  मार्कंडे, रिली मेरेडिथ ( Mumbai Indians Playing XI: 1 Ishan Kishan (wk), 2 Rohit Sharma (capt), 3 Tristan Stubbs, 4 Tilak Varma, 5 Tim David, 6 Daniel Sams, 7 Ramandeep Singh, 8 Sanjay Yadav, 9 Jasprit Bumrah, 10 Mayank Markande, 11 Riley Meredith)

नाणेफेकीनंतर कॅप्टन्स काय म्हणाले?

  • केन विलियम्सन - आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती, खेळपट्टी पाहता आणि आमची ताकद लक्षात घेता मोठी धावसंख्या उभी करण्याचे आमचे लक्ष्य आहे. प्रियांक गर्ग हा शशांक सिंगच्या जागी आणि फझल फारुकी हा मार्को येनसेनच्या जागी संघात खेळणार आहेत. आता पुढील टप्पा गाठण्यासाठी चुरशीची टक्कर आहे आणि नेट रन रेटवर लक्ष ठेवून आम्हाला खेळायचे आहे. प्रियाम व अभिषेक आज सलामीला येतील. 
  • रोहित शर्मा - आम्ही काही गोष्टी चाचपडून पाहत आहोत.  हृतिक शोकिन व कुमार कार्तिकेय या दोन फिरकीपटूंच्या जागी आज मयांक मार्कंडे व संजय यादव खेळणार आहेत. आम्ही काही खेळाडूंवर लक्ष ठेवून आहोत आणि त्यांना काही सामने खेळण्याची संधी देत आहोत. त्यामुळे आणखी काही खेळाडूंना विश्रांती दिली जाईल.. आमचा एक सामना शिल्लक आहे, त्यात आणखी काही खेळाडूंना संधी मिळेल.

 

रोहित शर्माच्या या विधानाने पुन्हा एकदा अर्जुन तेंडुलकरला संधी मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण, प्रत्यक्षात २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कोणाला संधी मिळते यावरून हे चित्र स्पष्ट होईल. 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादअर्जुन तेंडुलकररोहित शर्मा
Open in App