Join us  

Jasprit Bumrah IPL 2022 MI vs SRH Live Updates : जसप्रीत बुमराहची विक्रमी कामगिरी; आनंदाने उड्या मारू लागल्या मालकीणबाई, Video 

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : अभिषेक ( ९)  तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर प्रियांम गर्ग व राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक खेळ केला. गर्गला १० धावांवर जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याने सुसाट कामगिरी केली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 9:46 PM

Open in App

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : ओपनिंग जोडी बदलणे आज सनरायझर्स हैदराबादच्या पथ्यावर पडले. अभिषेक शर्मा अपयशी ठरला, परंतु त्याच्या जोडीला आलेल्या प्रियाम गर्गने ( Priyam Garg ) अफलातून खेळी केली. राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना पळता भुई करून सोडले... १८व्या षटकात रमणदीप सिंगने दोन धक्के दिल्याने SRHच्या धावगतीला ब्रेक लागला खरा, परंतु तोपर्यंत MI समोर धावांचा डोंगर उभा राहिला होता. 

अभिषेक ( ९)  तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर प्रियांम गर्ग व राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक खेळ केला. गर्गला १० धावांवर जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याने दोन खणखणीत षटकारही खेचले. गर्ग व त्रिपाठी यांची ४३ चेंडूंवर ७८ धावांची भागीदारी १०व्या षटकात संपुष्टात आली. रमणदीप सिंगने स्वतःच्याच गोलंदाजीवर अफलातून परतीचा झेल टिपला. गर्ग २६ चेंडूंत  चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर माघारी परतला. त्रिपाठी व पूरन यांनीही २९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.  १७व्या षटकात SRHची सेट झालेली भागीदारी संपुष्टात आली. पूरन २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारासह ३८ धावांवर बाद झाला. 

पुढच्याच षटकात रमणदीपने आणखी एक  सेट फलंदाज माघारी पाठवला. त्रिपाठी ४४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावांवर बाद झाला. पूरन व त्रिपाठी यांनी ४२ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एडन मार्कराम ( २) बाद झाला. सॅम्स ( १-३९) व रिले मेरेडिथ ( १-४४) यांची चार षटकं महागडी ठरली. रमणदीपने ३ षटकांत २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. हैदराबादने ६ बाद १९३ धावा केल्या. पूरन व त्रिपाठी यांची विकेट पडल्यानंतर प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या आणि मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांची ती पत्नी श्लोका मेहता या खूपच आनंदी झाल्या. विकेट पडल्यानंतर त्यांना आनंदाने उड्या मारताना सर्वांना पाहिले. ( पाहा IPL 2022 - MI vs SRH सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

 दरम्यान, जसप्रीतने  २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरचा त्रिफळा उडवून मोठा विक्रम नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला जलदगती गोलंदाज ठरला. या विक्रमात भुवनेश्वर कुमार ( २२३) व जयदेव उनाडकट ( २०१) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.  

 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादजसप्रित बुमराहआकाश अंबानी
Open in App