Join us  

Tim David IPL 2022, MI vs DC : RCBचा 'मस्का'; सामन्याआधी Mumbai Indians च्या टीम डेव्हिडला Faf du Plessisने पाठवला मॅसेज अन्... Video 

दिल्लीच्या पराभवाने RCBचे प्ले ऑफचे तिकिट पक्के होणार होते आणि ते झाले... मुंबई इंडियन्सच्या हातात चावी असल्याने RCB ने रोहित शर्माच्या संघाला आधीच पाठिंबा जाहीर केला होता.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 4:37 PM

Open in App

Mumbai Indians IPL 2022, MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना हा मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) साठी जेवढा महत्त्वाचा नव्हता त्यापेक्षा अधिक तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी होता. दिल्लीच्या पराभवाने RCBचे प्ले ऑफचे तिकिट पक्के होणार होते आणि ते झाले... मुंबई इंडियन्सच्या हातात चावी असल्याने RCB ने रोहित शर्माच्या संघाला आधीच पाठिंबा जाहीर केला होता.  विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी हे जाहीर केलं होतं. त्यामुळेच सामना पाहण्यासाठी सर्व RCB चे खेळाडू टीव्ही समोर बसलेले सर्वांनी पाहिले. मुंबईच्या विजयानंतरचा त्यांचा जल्लोषही पाहिला. मुंबईला खूश ( चिअर ) करण्यासाठी RCB ने सोशल मीडियावरील लोगोचा रंग निळा केला, MI ला शुभेच्छांच पत्र पाठवलं... हे सर्व त्यांनी उघडउघड केलं.. पण, त्यांनी MIच्या खेळाडूंना मस्का लावण्याची संधीही सोडली नाही. टीम डेव्हिडने ( Tim David) दिल्लीच्या पराभवानंतर RCB कडून आलेल्या मॅसेजबद्दल सांगितले तेव्हा ही बाब उघड झाली. 

 

काल झालेल्या सामन्यात जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah)ने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेत दिल्लीचे कंबरडे मोडले. डेव्हिड वॉर्नर ( ५), मिचेल मार्श ( ०), पृथ्वी शॉ ( २४) आणि सर्फराज खान ( १०) हे फलंदाज अपयशी ठरले.  रोव्हमन पॉवेल ( ४३) व रिषभ पंत ( ३९) यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा २ धावांवर माघारी परतला, परंतु डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३७) व इशान ( ४८) या जोडीने ५१ धावांची भागीदारी केली. टीम डेव्हिडने ११ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३४ धावा करून सामना मुंबईच्या पारड्यात आणून दिला होता. तिलक वर्मा २१ धावांवर माघारी परतला. मुंबईने ५ विकेट्स व ५ चेंडू राखून विजय मिळवताना आयपीएल २०२२चा निरोप घेतला आणि दिल्लीच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या स्वप्नांचा चुराडा केला.

या सामन्यानंतर टीम डेव्हिड काय म्हणाला?''विजयाने निरोप घेत असल्याचा आनंद होतोय.. यापेक्षा चांगला शेवट आम्ही अपेक्षित करू शकत नाही. जेव्हा इशान पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा त्याने मला विकेट फ्लॅट झाल्याचे सांगितले. त्यानुसार मी खेळलो. मागील सहा सामने आम्ही चांगले खेळलो. त्यापैकी आम्ही चार सामने जिंकलो. त्यामुळे पुढील प्रवास करण्यासाठी हा खूप मोठा आत्मविश्वास आम्हाला मिळाला आहे. सामन्याच्या सकाळी मला फॅफ कडून मॅसेज आला. त्यात त्याने एक फोटो पाठवला होता आणि त्यात त्याच्यासह ग्लेन  मॅक्सवेल व विराट कोहली यांनी मुंबई इंडियन्सची जर्सी घातली होती. कदाचित तो मी नंतर इंस्टाग्रामवर पोस्ट करेन,''असे टीम डेव्हिड म्हणाला. 

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App