Join us  

Rohit Sharma Sachin Tendulkar, IPL 2022: Mumbai Indiansच्या रोहित शर्माने लगावला उत्तुंग षटकार; खुद्द सचिन तेंडुलकरनेही केला टाळ्यांचा कडकडाट

तुम्हीही एकदा हा सिक्स पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 4:40 PM

Open in App

Rohit Sharma Six Sachin Tendulkar, IPL 2022 MI vs DC Live: पाच वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या Mumbai Indians च्या संघाने यंदाच्या हंगामाची सुरूवात आज Delhi Capitals संघाविरूद्धच्या सामन्याने केली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जात असलेल्या सामन्यात रिषभ पंतने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन ओपनिंगला आले. पहिल्या षटकात रोहितने आपला इरादा स्पष्ट करत उत्तुंग असा षटकार मारला. विशेष बाब म्हणजे, त्याच्या षटकारानंतर खुद्द मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही टाळ्यांचा कडकडाट केला.

दिल्लीच्या संघाकडून शार्दूल ठाकूरने सुरूवात केली. षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून थेट षटकार लगावला. षटकार खूपच उत्तुंग गेला. त्याच्या षटकाराने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला. त्यातही विशेष बाब म्हणजे सचिन तेंडुलकरनेही डगआऊट मध्ये टाळ्यांचा कडकडाट करत रोहितच्या षटकाराचं स्वागत केलं. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, मेगालिलावात बरीच उलथापालथ झाल्यानंतर या सामन्यात मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्ड, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश केलाच. पण त्याशिवाय काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली.

दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, टीम सीफर्ट, मनदीप सिंग, रिषभ पंत, रोव्हमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, खलिल अहमद, कमलेश नागरकोटी

मुंबई इंडियन्स - इशान किशन, रोहित शर्मा, तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंग, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बसील थम्पी

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मासचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्स
Open in App