Join us  

Arjun Tendulkar IPL 2022 MI vs DC Live Updates : रोहित शर्माने शब्द पाळला, संघात केले दोन बदल; पण पावसाच्या एन्ट्रीने RCBचे फॅन्स आनंदी

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या लढतीच्या निकालानंतर  इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील प्ले ऑफच्या शर्यतीतील चौथा स्पर्धक ठरणार आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 7:02 PM

Open in App

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या लढतीच्या निकालानंतर  इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील प्ले ऑफच्या शर्यतीतील चौथा स्पर्धक ठरणार आहे.  MI जिंकावा ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ( RCB) इच्छा आहे. पण, DC नेही विजयाचा निर्धार पक्का केला आहे आणि त्यांचे सह मालक पार्थ जिंदाल यांनी आम्हीच जिंकू असा दावा केलाय. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्ली विरुद्ध मुंबई-बंगळुरू अशी चुरस पाहायला मिळणार आहे. पण, आजच्या सामन्यात Arjun Tendulkar हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. मुंबईचे आव्हान संपुष्टात आल्याने त्यांनी नव्या खेळाडूंना संधी दिली आणि याही सामन्यात तसे बदल पाहायला मिळतील असे कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता. त्यामुळे आजतरी अर्जुनला संधी मिळावी, अशी मागणी सुरू आहे. 

अखेरच्या साखळी सामन्यात RCB ने गुजरात टायटन्सला पराभूत करून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले. आरसीबीच्या विजयामुळे मात्र पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांचे आव्हान संपुष्टात आले. आता आज मुंबई विरुद्ध दिल्ली असा सामना आहे आणि त्यात आम्ही मुंबईला सपोर्ट करणार हे  RCBचा कर्णधार फॅफ ड्यू  प्लेसिस व विराट कोहली यांनी आधीच स्पष्ट केले होते. मुंबईने आज दिल्लीला हरवल्यास RCBचा प्ले ऑफचा मार्ग निश्चित होईल. पण, जर दिल्ली जिंकल्यास समान गुण असूनही उत्तम नेट रन रेटच्या जोरावर रिषभ पंतचा संघ प्ले ऑफमध्ये जाईल. RCB चा नेट रन रेट हा -0.253 असा आहे, तर दिल्लीचा 0.255 आहे. त्यामुळे दिल्लीचा पराभव हा RCB साठी महत्त्वाचा आहे. 

अर्जुनच्या मागून संघात बदली खेळाडू म्हणून आलेल्या कुमार कार्तिकेय, त्रिस्तान स्तुब्ब्स यांनी पदार्पण केले. हृतिक शोकिन यालाही संधी मिळाली, परंतु अर्जुन अजून नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरलामुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएल २०२१मध्येही मुंबईने अर्जुनला खेळवले नाही. अखेर आजतरी मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी द्यावी अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. डेव्हॉल्ड ब्रेव्हिस आणि हृतिक शोकिन यांचे पुनरागमन झाले. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु पावसाच्या आगमनाने सामना उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सअर्जुन तेंडुलकरदिल्ली कॅपिटल्स
Open in App