Join us

IPL 2022 MI vs DC Live: Hardik Pandya च्या जागी Mumbai Indians च्या संघात आलेल्या Tim David ने मारला अफलातून षटकार

मुंबईने २० षटकांत केल्या १७७ धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 18:36 IST

Open in App

IPL 2022 MI vs DC Live: Mumbai Indians ने दिल्ली विरूद्ध पहिल्याच सामन्यात तुफान फटकेबाजी केली. १५ कोटींहून अधिकची बोली लावून संघात घेतलेल्या इशान किशनने नाबाद ८१ धावांची खेळी केली. रोहित शर्मानेही दमदार ४१ धावा केल्या. सामन्यात Hardik Pandya च्या जागी संधी मिळालेला Tim David फारशी चमक दाखवू शकला नाही. पण त्याच्या एका षटकाराने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

मुंबईने २० षटकात ५ बाद १७७ पर्यंत मजल मारली. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशनने संघाला दमदार सुरूवात करून दिली. रोहित शर्माने ३२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्मा ३ चौकार मारले पण तो २२ धावांवर माघारी परतला. अनुभवी किरॉन पोलार्डनेही चाहत्यांची निराशा केली. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या जागी फिनिशरची भूमिका दिलेल्या टीम डेव्हिडने धडाकेबाज षटकार मारला. चेंडू उसळता असूनही त्याने थेट गोलंदाजाच्या डोक्यावरून मोठा षटकार खेचला. पाहा तो षटकार-

दरम्यान, तो ७ चेंडूत १२ धावांवर बाद झाला. इशान किशनने मात्र पूर्ण २० षटके खेळून काढली आणि नाबाद ८१ धावा कुटल्या. त्याने ११ चौकार आणि २ षटकार लगावले.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्यारोहित शर्मा
Open in App