MS Dhoni IPL 2022 MI vs CSK Live Updates : महेंद्रसिंग धोनीच्या खेळीला Ravindra Jadejaचा मुजरा, Sunil Gavaskar यांनाही करावं लागलं सलाम, Video

IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अजूनही तो मॅच फिनिशर आहे हे दाखवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:21 AM2022-04-22T00:21:01+5:302022-04-22T00:22:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs CSK Live Updates : This gesture from Ravindra Jadeja sums up the admiration every player has for MS Dhoni, Sunil Gavaskar also applause his innings, Video | MS Dhoni IPL 2022 MI vs CSK Live Updates : महेंद्रसिंग धोनीच्या खेळीला Ravindra Jadejaचा मुजरा, Sunil Gavaskar यांनाही करावं लागलं सलाम, Video

MS Dhoni IPL 2022 MI vs CSK Live Updates : महेंद्रसिंग धोनीच्या खेळीला Ravindra Jadejaचा मुजरा, Sunil Gavaskar यांनाही करावं लागलं सलाम, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अजूनही तो मॅच फिनिशर आहे हे दाखवून दिले. अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना CSKची विकेट पडली. त्यानंतर चार चेंडूंत १६ धावा करायच्या असूनही MS Dhoni शांत उभा राहिला आणि त्यानंतर जे वादळ घोंगावलं त्याने मुंबई इंडियन्सच्या (  Mumbai Indians) विजयाच्या स्वप्नांचा पालापाचोळा केला. या अविश्वसनीय कामगिरीनंतर जेव्हा धोनी विजयी योद्ध्याप्रमाणे पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता तेव्हा कर्णधार रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) मैदानावर आला अन् मानाचा मुजरा केला. दुसरीकडे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनीही सॅल्यूट करून धोनीच्या खेळीला दाद दिली.

मुकेश चौधरीने मुंबई इंडियन्सला धक्के दिले. रोहित शर्मा व इशान किशन यांना भोपळ्यावर त्याने माघारी पाठवले. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसला ( ४) अपयश आले. सूर्यकुमार यादव ( ३२), पदार्पणवीर हृतिक शोकिन ( २५), जयदेव उनाडकट ( १९) व किरॉन पोलार्ड ( १४) यांनी योगदान दिले. १९ वर्षीय तिलक वर्माने ४३ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या आणि मुंबईला ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवले. मुकेश चौधरीने १९ धावांत ३, ड्वेन ब्राव्होने ३६ धावांत २ विकेट्स घेतल्या.  

प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड गोल्डन डकवर बाद झाला. मिचेल सँटनर ( ११) माघारी परतल्यानंतर  रॉबिन उथप्पा (३०)  व अंबाती रायुडू  ( ४०) या अनुभवी जोडीने अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला.  शिवम दुबेला ( १४) इशान किशनने अप्रतिम झेल घेऊन माघारी पाठवले. डॅनिएल सॅम्सने ३० धावांत ४ विकेट्स घेतल्या. CSK ला अखेरच्या षटकात १७ धावा करायच्या होत्या. उनाडकटने अखेरच्या षटकात प्रेटोरियसला ( २२) बाद करून MIला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. ड्वेन ब्राव्होने एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिली आणि त्याने खणखणीत षटकार खेचला. नंतर चौकार खेचला. २ चेंडूवर ६ धावा असताना धोनीने दोन धावा घेतल्या. अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून धोनीने चेन्नईचा विजय पक्का केला.

या सामन्यापूर्वी गावस्करांनी मुंबईला सपोर्ट दिला होता आणि निकालानंतर त्यांनी CSKला सपोर्ट करणाऱ्या मॅथ्यू हेडनसमोर नतमस्तक झाले.


Web Title: IPL 2022 MI vs CSK Live Updates : This gesture from Ravindra Jadeja sums up the admiration every player has for MS Dhoni, Sunil Gavaskar also applause his innings, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.