Join us  

Suresh Raina on MS Dhoni IPL 2022 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीच्या मॅच फिनिशर इनिंग्जवर क्रिकेट विश्व नतमस्तक झाले, सुरेश रैनाचे ट्विट लक्ष वेधून गेले

उनाडकटने २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ड्वेन प्रेटोरियसला ( २२) बाद करून MIला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. पण, ड्वेन ब्राव्होने एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिली आणि त्याने पुढील चार चेंडूंवर ६,४,२,४ अशी फटकेबाजी करून चेन्नईचा विजय पक्का केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:54 AM

Open in App

IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अजूनही तो मॅच फिनिशर आहे हे दाखवून दिले. अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना CSKची विकेट पडली. त्यानंतर चार चेंडूंत १६ धावा करायच्या असूनही MS Dhoni शांत उभा राहिला आणि त्यानंतर जे वादळ घोंगावलं त्याने मुंबई इंडियन्सच्या (  Mumbai Indians) विजयाच्या स्वप्नांचा पालापाचोळा केला. धोनीच्या या मॅच फिनिशर इनिंग्जवर क्रिकेट विश्व नतमस्तक झाले. सुरेश रैनाचे (  Suresh Raina) ट्विट लक्ष वेधून गेले.प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड गोल्डन डकवर बाद झाला. मिचेल सँटनर ( ११) माघारी परतल्यानंतर  रॉबिन उथप्पा (३०)  व अंबाती रायुडू  ( ४०) या अनुभवी जोडीने अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला.  शिवम दुबेला ( १४) इशान किशनने अप्रतिम झेल घेऊन माघारी पाठवले. डॅनिएल सॅम्सने ३० धावांत ४ विकेट्स घेतल्या. CSK ला अखेरच्या षटकात १७ धावा करायच्या होत्या. उनाडकटने पहिल्या चेंडूवर ड्वेन प्रेटोरियसला ( २२) बाद करून MIला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले.  पण, ड्वेन ब्राव्होने एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिली आणि त्याने पुढील चार चेंडूंवर ६,४,२,४ अशी फटकेबाजी करून चेन्नईचा विजय पक्का केला. धोनी १३ चेंडूंवर २८ धावांवर नाबाद राहिला.पाहा कोण काय म्हणाले... मुकेश चौधरीने मुंबई इंडियन्सला धक्के दिले. रोहित शर्मा व इशान किशन यांना भोपळ्यावर त्याने माघारी पाठवले. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसला ( ४) अपयश आले. सूर्यकुमार यादव ( ३२), पदार्पणवीर हृतिक शोकिन ( २५), जयदेव उनाडकट ( १९) व किरॉन पोलार्ड ( १४) यांनी योगदान दिले. १९ वर्षीय तिलक वर्माने ४३ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या आणि मुंबईला ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवले. मुकेश चौधरीने १९ धावांत ३, ड्वेन ब्राव्होने ३६ धावांत २ विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२सुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App