IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या वानखेडे स्टेडियमवर भलताच प्रकार घडला. पॉवर कटमुळे या सामन्यात DRS सुविधात उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांना DRS घेता आला नाही. त्याचा मोठा फायदा मात्र मुंबई इंडियन्सला झाला. CSK चे ३ फलंदाज ५ धावांवर माघारी परतले. डावाच्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॅनिएल सॅम्सने CSKचा ओपनर डेव्हॉन कॉनवे याला LBW केले. पण, चेंडू यष्टींना चकवून जात असल्याचे दिसत होते, मात्र पॉवर कटमुळे कॉनवेला DRS घेता आला नाही आणि त्याला माघारी जावे लागले. चौथ्या चेंडूवर मोईन अली झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने CSK ला तिसरा धक्का देताना रॉबिन उथप्पाला LBW केले. याहीवेळेस DRS घेता न आल्याने उथप्पला माघारी जावे लागले.
इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी
चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) इतरांच्या कामगिरीच्या भरवशासह स्वतःला प्रत्येक विजय मिळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मागील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) थरारक विजय मिळवून दिला होता. त्याचा बदला घेण्यासाठी मुंबई सज्ज आहेच. स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आल्यामुळे MI कडे गमवण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे ते CSK विरुद्ध कोणत्याही दडपणाशिवाय मैदानावर उतरणार आहेत. रवींद्र जडेजाचे नसणे ही CSKसाठी चिंतेची बाब ठरणारी आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईने आजच्या सामन्यात किरॉन पोलार्डला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला.