Powercut IPL 2022 MI vs CSK Live Update : CSKला पॉवर कटमुळे DRS नाही घेता आला; नेटिझन्सने मीम्सच्या माध्यमातून राग व्यक्त केला

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात असे कधीच घडले नसेल ते वानखेडे स्टेडियममध्ये झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 09:37 PM2022-05-12T21:37:15+5:302022-05-12T21:37:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs CSK Live Update : Twitter reacts after Devon Conway given out with no DRS review because of powercut, see mems | Powercut IPL 2022 MI vs CSK Live Update : CSKला पॉवर कटमुळे DRS नाही घेता आला; नेटिझन्सने मीम्सच्या माध्यमातून राग व्यक्त केला

Powercut IPL 2022 MI vs CSK Live Update : CSKला पॉवर कटमुळे DRS नाही घेता आला; नेटिझन्सने मीम्सच्या माध्यमातून राग व्यक्त केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात असे कधीच घडले नसेल ते वानखेडे स्टेडियममध्ये झाले. पॉवर कटमुळे चेन्नई सुपर किंग्सच्या डावातील पहिल्या तीन षटकांत DRS प्रणालीच कार्यरत नव्हती आणि त्याचा फटका संघाला बसला. डेवॉन कॉनवे या त्याचा बळी ठरला आणि फॉर्मात असलेला फलंदाज नाबाद असूनही आज भोपळ्यावर माघारी परतला. त्यानंतर चेन्नईची गाडी घसरली आणि त्यांना ९७ धावाच करता आल्या. Powercut मुळे नेटिझन्स मात्र खवळले आणि त्यांनी मीम्सच्या माध्यमातून राग व्यक्त केला. 

ऋतुराज गायकवाड ( ७), डेवॉन ( ०) , रॉबिन उथप्पा ( १)  व मोईन अली ( ०) हे चार फलंदाज १७ धावांवर माघारी परतला. डॅनिएल सॅम्स, जसप्रीत बुमराह व रिली मेरेडिथ यांनी आज सुरेख गोलंदाजी केली. कुमार कार्तिकेयनही मिळालेल्या संधीचं सोनं केलं. अंबाती रायुडू ( १०), शिवम दुबे ( १०)  व ड्वेन ब्राव्हो ( १२) यांनाही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जाळ्यात अडकवले. इशान किशन व ललित यादव यांनी दोन अफलातून झेल टिपले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) एकटा खिंड लढवताना दिसला. त्याने ३३ चेंडूंत नाबाद ३६ धावा केल्या. चेन्नईचा डाव १६ षटकांत ९७ धावांवर गडगडला. डॅनिएल स‌‌ॅम्सने १६ धावांत ३, रिले मेरेडिथने २७ धावांत २ व कुमार कार्तिकेयने २२ धावांत २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह व रमणदीप सिंग यांच्या वाट्याला प्रत्येकी एक विकेट आली.  ( पाहा IPL 2022 - MI vs CSK  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

 

 

Web Title: IPL 2022 MI vs CSK Live Update : Twitter reacts after Devon Conway given out with no DRS review because of powercut, see mems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.