Join us  

Kieron Pollard IPL 2022 MI vs CSK Live Update : वाढदिवशीच किरॉन पोलार्डला मुंबई इंडियन्सने बाकावर बसवले; २१ वर्षाच्या नव्या खेळाडूला दिली पदार्पणाची संधी

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) इतरांच्या कामगिरीच्या भरवशासह स्वतःला प्रत्येक विजय मिळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 7:11 PM

Open in App

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) इतरांच्या कामगिरीच्या भरवशासह स्वतःला प्रत्येक विजय मिळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मागील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) थरारक विजय मिळवून दिला होता. त्याचा बदला घेण्यासाठी मुंबई सज्ज आहेच. स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आल्यामुळे MI कडे गमवण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे ते CSK विरुद्ध कोणत्याही दडपणाशिवाय मैदानावर उतरणार आहेत. रवींद्र जडेजाचे नसणे ही CSKसाठी चिंतेची बाब ठरणारी आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ( पाहा IPL 2022 - MI vs CSK  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

मुंबईने आजच्या सामन्यात किरॉन पोलार्डला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज त्रिस्ताना स्तुब्स ( Tristana Stubbs)ला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. आजही अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar) डग आऊटमध्ये बसून मॅच पाहावी लागणार आहे. इंग्लंडचा गोलंदाज टायमल मिल्स ( Tymal Mills) याने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आणि त्याच्या जागी  स्तुब्स ( Tristana Stubbs) याला करारबद्ध करण्यात आले होते. मिल्सने यंदाच्या पर्वात ५ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये एकूण त्याच्या नावावर १० सामन्यांत ११ विकेट्स आहेत. त्याच्याजागी २१ वर्षीय त्रिस्तानाला MI ने करारबद्ध केले आहे. मधल्या फळीतील २१ वर्षीय फलंदाजाने नुकतेच दक्षिण आफ्रिकन A संघातून झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याने १७ ट्वेंटी-२० सामन्यांत ३८.९२च्या सरासरीने ५०६ धावा केल्या आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सकिरॉन पोलार्ड
Open in App