Join us  

IPL 2022 MI vs CSK Live Update : हम तो डुबे है, तुम्हें भी...!; Mumbai Indiansने चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आणले, IPLमध्ये हे प्रथमच घडले!

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : चेन्नई सुपर किंग्सचा डाव ९७ धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबई इंडियन्स सहज बाजी मारेल असेच वाटले होते. पण, त्यांनाही संघर्ष करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:45 PM

Open in App

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : चेन्नई सुपर किंग्सचा डाव ९७ धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबई इंडियन्स सहज बाजी मारेल असेच वाटले होते. पण, त्यांनाही संघर्ष करावा लागला. मुकेश चौधरी व सिमरजीत सिंग यांनी MIला चांगले दणके दिले. मात्र,  तिलक वर्मा व हृतिक शोकिन या युवा फलंदाजांनी चिकाटीने खेळ करताना मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे CSK चे प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आले. MI पाठोपाठ आयपीएल २०२२मधून बाद होणारा तो दुसरा संघ ठरला. आयपीएल इतिहासात एकाच पर्वात हे दोन यशस्वी संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आता प्ले ऑफच्या दोन जागांसाठी ६ स्पर्धक शर्यतीत राहिले आहेत. ( 5 time IPL champions Mumbai and 4 time IPL champions Chennai failed to qualify into the play-offs of IPL 2022.) 

रोहित शर्मा व इशान किशन ही जोडीच या धावा करतील असे वाटत असताना मुकेश चौधरीने कमाल केली. इशानला ( ६) माघारी पाठवून MI वर त्याने दडपण निर्माण केले. रोहितने काही सुरेख फटके मारले, परंतु सिमरजीत सिंगने त्यालाही ( १८) बाद करून मुंबईला धक्का दिला. दोन्ही सलामीवीर ३० धावांवर माघारी परतले. तीन धावानंतर मुकेशने आणखी एक धक्का देताना डॅनिएल सॅम्सला LBW केले. पदार्पणवीर त्रिस्ताना स्तुब्स यालाही LBW करून मुकेशने चौथा धक्का दिला. मुकेशने ४ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मुकेश  ( Mukesh Choudhary ) व सिमरजीत सिंग ( Simarjeet Singh ) या गोलंदाजांकडून पहिली ८ षटकं टाकून घेताना धोनीने MIची कोंडी केली. सिमरजीतने २२ धावांत १ विकेट घेतली.  तिलक वर्मा व हृतिक शोकिन यांनी MIचा डाव सावरला. त्यांना नशिबाचीही साथ मिळाली. या दोघांनी सावध खेळ करताना ४८ धावांची भागीदारी केली. शोकिन १८ धावांवर मोईन अलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पण, तो त्याची कामगिरी चोख बजावून गेला. मुंबईने हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. विजयासाठी ९ धावा हव्या असताना टीम डेव्हिडने दोन खणखणीत सिक्स  खेचून विजय पक्का केला. तिलक ३४ धावांवर नाबाद राहिला. मुंबईने १४.५ षटकांत ५ बाद १०३ धावा केल्या.

ऋतुराज गायकवाड ( ७), डेवॉन ( ०) , रॉबिन उथप्पा ( १)  व मोईन अली ( ०) हे चार फलंदाज १७ धावांवर माघारी परतला. डॅनिएल सॅम्स, जसप्रीत बुमराह व रिली मेरेडिथ यांनी आज सुरेख गोलंदाजी केली. कुमार कार्तिकेयनही मिळालेल्या संधीचं सोनं केलं. अंबाती रायुडू ( १०), शिवम दुबे ( १०)  व ड्वेन ब्राव्हो ( १२) यांनाही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जाळ्यात अडकवले. इशान किशन व ललित यादव यांनी दोन अफलातून झेल टिपले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) एकटा खिंड लढवताना दिसला. त्याने ३३ चेंडूंत नाबाद ३६ धावा केल्या. चेन्नईचा डाव १६ षटकांत ९७ धावांवर गडगडला. डॅनिएल स‌‌ॅम्सने १६ धावांत ३, रिले मेरेडिथने २७ धावांत २ व कुमार कार्तिकेयने २२ धावांत २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह व रमणदीप सिंग यांच्या वाट्याला प्रत्येकी एक विकेट आली. ( पाहा IPL 2022 - MI vs CSK  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App