Join us  

No DRS IPL 2022 MI vs CSK Live Update : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केली कमाल; संघमालक आकाश अंबानी झाले खूश 

पॉवर कटमुळे या सामन्यात DRS सुविधात उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांना DRS घेता आला नाही. त्याचा मोठा फायदा मात्र मुंबई इंडियन्सला झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 8:46 PM

Open in App

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या वानखेडे स्टेडियमवर भलताच प्रकार घडला. पॉवर कटमुळे या सामन्यात DRS सुविधात उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांना DRS घेता आला नाही. त्याचा मोठा फायदा मात्र मुंबई इंडियन्सला झाला. CSK चे ३ फलंदाज ५ धावांवर माघारी परतले. डावाच्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॅनिएल स‌ॅम्सने CSKचा ओपनर डेव्हॉन कॉनवे याला LBW केले. पण, चेंडू यष्टींना चकवून जात असल्याचे दिसत होते, मात्र पॉवर कटमुळे कॉनवेला DRS घेता आला नाही आणि त्याला माघारी जावे लागले. चौथ्या चेंडूवर मोईन अली झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने CSK ला तिसरा धक्का देताना रॉबिन उथप्पाला LBW केले. याहीवेळेस DRS घेता न आल्याने उथप्पला माघारी जावे लागले.  तीन षटकं DRS शिवाय खेळ झाल्याचा चेन्नईला खूप मोठा फटका बसला. फॉर्मात असलेला कॉनवे ( ०) व रॉबिन उथप्पा ( १) हे या तांत्रिक बिघाडाचे बळी ठरले. चौथ्या षटकानंतर पॉवर आली आणि DRS सुरू झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडही ( ७) बाद झाला आणि महेंद्रसिंग धोनीला पाचव्या षटकातच मैदानावर यावे लागले. अंबाती रायुडू हा नेहमीच वानखेडेवर खेळतो आणि येथे त्याने १०००च्या वर धावा केल्या आहेत. आज तो डाव सारवेल असे वाटले होते, परंतु रिली मेरेडिथने त्याला बाद केले आणि CSKचा निम्मा संघ २९ धावांवर तंबूत परतला. सलग तिसऱ्या पर्वात मुंबई इंडियन्सविरुद्ध CSK ने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५ विकेट्स गमावल्या. २०२०मध्ये २४-५, २०२१ मध्ये २४-५ व आज ३२-५ अशी त्यांची अवस्था झाली. शिवम दुबे चांगला खेळत होता, परंतु मेरेडिथच्या बाऊन्सरवर अपर कट मारण्याच्या प्रयत्नात तो १० धावांवर बाद झाला. इशान किशनने भन्नाट कॅच घेतला. 

धोनी व ड्वेन ब्राव्हो या अनुभवी जोडीने काहीकाळ CSK ची पडझड थांबवली, परंतु कुमार कार्तिकेयने ही जोडी तोडली.  ब्राव्होचा ( १२) अफलातून झेल तिलक वर्माने टिपला. पुढच्याच चेंडूवर सिमरजीत सिंग (०) पायचीत झाला. चेन्नईची अवस्था ८ बाद ८० अशी झाली.  ( पाहा IPL 2022 - MI vs CSK  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App