Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction: Neeta Ambaniच्या नयनांवर जडली 'प्रिती'; पंजाबच्या मालकीणबाई Preity Zintaचं ट्वीट चर्चेत

IPL 2022 Mega Auction: प्रिती झिंटाने लिलावादरम्यान मुंबईच्या स्टाफचं आणि संघमालक नीता अंबानी यांचं कौतुक केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 03:35 PM2022-02-13T15:35:10+5:302022-02-13T15:37:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Mega Auction Hot Bollywood Actress Punjab team owner Preity Zinta fall in love with Mumbai Indians owner Neeta Ambani pretty eyes see tweet | Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction: Neeta Ambaniच्या नयनांवर जडली 'प्रिती'; पंजाबच्या मालकीणबाई Preity Zintaचं ट्वीट चर्चेत

Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction: Neeta Ambaniच्या नयनांवर जडली 'प्रिती'; पंजाबच्या मालकीणबाई Preity Zintaचं ट्वीट चर्चेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Mega Auction: बॉलीवूड स्टार आणि आयपीएल संघ Punjab Kingsची सहमालक Preity Zintaने बंगळुरूमध्ये IPL मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी Mumbai Indiansच्या मालक आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक केले. मुंबईच्या संघ व्यवस्थापनातील लोकांनी कोविड नियमांचे पालन केल्याबद्दल मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावर एक ट्वीट करत प्रितीने त्यांचे कौतुक केले. त्याचवेळी तिने मुंबईच्या मालकीणबाई नीता अंबानी यांच्या डोळ्यांचे कौतुकदेखील केले. “IPL लिलावाच्या वेळी टेबलवर मुंबई इंडियन्सचा चमू कोविड नियमांचे पालन करत आहेत हे पाहून आनंद झाला. अजून एक गोष्ट मी मान्य करायलाच हवी की नीता अंबानींचे डोळे खूपच सुंदर आहेत", असं तिने थेट ट्विटमध्येच लिहिलं.

प्रिती झिंटाने हे ट्वीट केल्यानंतर या ट्वीटला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. २४ तासांच्या आतच तिच्या ट्वीटवर ९ हजारांहून अधिक लाईक मिळाले. तर शंभरहून अधिक कमेंट्स आल्या. यंदाच्या ऑक्शनसाठी प्रिती झिंटा सहभागी होऊ शकलेली नाही. मागील नोव्हेंबर महिन्यात प्रिती आणि तिचा पती जेन गुडनॉफ यांनी त्यांच्या घरी जुळी बाळं जन्माला आल्याची आनंदाची बातमी दिली होती. त्यामुळे यंदा प्रीतीने आयपीएल ऑक्शनला हजर न राहण्याचा निर्णय घेतला. तिने ट्विट केले की माझ्या लहान बाळांना इथे सोडून मी भारतात येऊ शकत नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात मी सहभागी होणार नाही.

Web Title: IPL 2022 Mega Auction Hot Bollywood Actress Punjab team owner Preity Zinta fall in love with Mumbai Indians owner Neeta Ambani pretty eyes see tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.