Join us  

IPL 2022 Mega Auctionमध्ये 'या' दोन खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार; एकानं BBLमध्ये पटकावलाय सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५ व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 3:00 PM

Open in App

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५ व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. डेव्हिड वॉर्नर, आर अश्विन, श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मार्क वूड, ट्रेंट बोल्ट, फॅफ ड्यू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा आणि ड्वेन ब्राव्हो या स्टार खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रत्येक फ्रँचायझी उत्सुक असणार आहे. पण, या स्टार्सना सोडून असे दोन खेळाडू आहेत की ज्यांच्यावर फ्रँचायझी पैशांचा वर्षाव करू शकते. 

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर बेन मॅकडेर्मोट ( Ben McDermott) आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्ड ( Romario Shepherd ) या दोन खेळाडूंवर IPL 2022 Mega Auction मध्ये पैशांचा वर्षाव होऊ शकतो. त्यांना प्रथमच आयपीएलचा करार मिळण्याची अपेक्षा आहे. या दोन्ही खेळाडूंना मागच्या पर्वात एकाही फ्रँचायझीनं ताफ्यात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नव्हती. पण, या दोघांचा सध्याचा फॉर्म फ्रँचायझींना यावेळी नजरअंदाज करता येण्यासारखा नाही. मॅकडेर्मोटनं BBLमध्ये हवा केली आहे आणि त्यानं स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळेच त्याची पुढील महिन्यात  श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली आहे.

२७ वर्षीय मॅकडेर्मोटनं BBL च्या यंदाच्या पर्वात १५३.८६च्या स्ट्राईक रेटनं ५७७ धावा केल्या आहेत. त्यानं आतापर्यंत १७ ट्वेंटी-२० व २ वन डे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मागच्या लिलावात रिले मेरेडिथ ( ८ कोटी) आणि झाय रिचर्डसन ( १४ कोटी) या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना BBLच्या यशस्वी पर्वानंतर पंजाब किंग्सनं तगडी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले होते. 

दुसरीकडे शेफर्डनं ट्वेंटी-२०च्या २० डावांमध्ये २१ चौकार व २१ षटकार खेचले आहेत. त्यानं प्रत्येक सामन्यात किमान एक-एक चौकार-षटकार मारलेला आहे. याशिवाय त्याच्या नावावर ३६ डावांमध्ये ४९ विकेट्स आहेत. शेफर्डनं रविवारी 

टॅग्स :आयपीएल २०२१बिग बॅश लीगवेस्ट इंडिजआॅस्ट्रेलिया
Open in App