Join us

IPL 2022 Mega Auction : १० संघ, ५९० खेळाडू मैदानात पण, केवळ २१७ जणांसाठी पडणार ५५६.३ कोटींचा पाऊस!

IPL 2022 Mega Auction : 10 IPL Teams, 217 Spots, 556.3 Cr to spend - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी ५९० खेळाडू मैदानावर उतरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 14:10 IST

Open in App

IPL 2022 Mega Auction : 10 IPL Teams, 217 Spots, 556.3 Cr to spend - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी ५९० खेळाडू मैदानावर उतरले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे १० संघ या खेळाडूंचे भविष्य ठरवणार आहे. १२ व १३ फेब्रुवारी असा दोन दिवस हा लिलाव सोहळा पार पडणार आहे आणि ५९० खेळाडूंपैकी २१७ खेळाडूंची लॉटरी लागणार आहे. त्यासाठी फ्रँचायझी ५५६.३ कोटी मोजणार आहेत.  

प्रत्येक फ्रँचायझीला २५ खेळाडूंना करारबद्ध करता येणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक फ्रँचायझीला ९० कोटींचं बजेट दिले गेले आहे. त्यामुळे एकूण २५० खेळाडूंसाठी ९०० कोटी खर्च केले जाणार आहेत. आतापर्यंत ३३ खेळाडूंना कायम राखताना फ्रँचायझींनी मिळून ३४३.७ कोटी खर्च केले आहेत.  

१० फ्रँचायझींनी ३३ खेळाडूंसाठी खर्च केले ३३८ कोटी; जाणून घ्या प्रत्येक फ्रँचायझीचं बँक बॅलेन्स!

  • पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( १४ कोटी), अर्षदीप सिंग (४ कोटी) ; शिल्लक रक्कम - ७२ कोटी
  • सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( १४ कोटी), अब्दुल समद ( ४ कोटी), उम्रान मलिक ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६८ कोटी
  • राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( १४ कोटी), जोस बटलर ( १० कोटी), यशस्वी जैस्वाल ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६२ कोटी
  • लखनौ - लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) व रवी बिश्नोई ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ५८ कोटी
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी); शिल्लक रक्कम - ५७ कोटी
  • अहमदाबाद - हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ५२ कोटी
  • चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( १६ कोटी), महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( १६ कोटी), जसप्रीत बुमराह ( १४ कोटी), किरॉन पोलार्ड ( ६ कोटी), सूर्यकुमार यादव ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  • कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( १२ कोटी), वरुण चक्रवर्थी ( ८ कोटी), वेंकटेश अय्यर ( ८ कोटी) , सुनील नरीन ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  • दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( १६ कोटी), अक्षर पटेल ( १२ कोटी), पृथ्वी शॉ ( ८ कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४७ कोटी

 

कोणत्या संघाला किती खेळाडू करता येतील करारबद्ध

  • चेन्नई सुपर किंग्स - २१ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
  • दिल्ली कॅपिटल्स - २१ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)  
  • कोलकाता नाइट रायडर्स  - २१ खेळाडू ( त्यापैकी ६ परदेशी )
  • लखनौ सुपर जायंट्स - २२ खेळाडू ( त्यापैकी ७ पदेशी) 
  • मुंबई इंडियन्स - २१ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
  • पंजाब किंग्स - २३ खेळाडू ( त्यापैकी ८ परदेशी)
  • राजस्थान रॉयल्स - २२ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २२ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
  • सनरायझर्स हैदराबाद -  २२ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
  • गुजरात टायटन्स - २२ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी)
टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२
Open in App