Join us

IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्सचा पराभव व्हावा ही तर RCB, DC, KKR, SRH, PBKS ची इच्छा, जाणून घ्या प्ले ऑफचं मजेशीर गणित

IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : लखनौ सुपर जायंट्सच्या १६ गुण झाले असले तरी त्यांना टॉप टूमध्ये कायम राहून अंतिम फेरीसाठी एक अतिरिक्त संधी हाताशी ठेवायची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 19:12 IST

Open in App

IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : लखनौ सुपर जायंट्सच्या १६ गुण झाले असले तरी त्यांना टॉप टूमध्ये कायम राहून अंतिम फेरीसाठी एक अतिरिक्त संधी हाताशी ठेवायची आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आजच्या लढतीत विजय मिळवून प्ले ऑफचे तिकिट पक्के करण्यासह अव्वल दोनमधील स्थानही निश्चित करण्याचा LSG चा प्रयत्न आहे. लोकेश राहुलच्या संघाचा विजय व्हावा हे केवळ LSGच्या चाहत्यांनाच वाटत नाही, तर RCB, PBKS आणि DC हेही लखनौच्या विजयाची प्रार्थना करत आहेत. आज RR ने विजय मिळवला तर या संघाचा मार्ग अधिक खडतर होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जिमी निशॅम व ओबेड मॅकॉय यांना संघात स्थान मिळाले आहे व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन व कुलदीप सेन यांना विश्रांती देण्यात आली आहे. लखनौच्या संघात रवी बिश्नोई परतला आहे, करण शर्माला विश्रांती दिली गेली आहे.  ( पाहा IPL 2022 - LSG vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

LSGच्या विजयाचा कुणाला कसा फायदा... 

  • लखनौने विजय मिळवल्यास ते प्ले ऑफचं तिकिट पक्के करतील शिवाय टॉप टू मधील त्यांचे स्थानही निश्चित होईल. LSGच्या विजयासह गुजरात टायटन्सचेही टॉप टू मधील स्थान पक्के होईल.
  • रॉय चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ १३ सामन्यांत १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मागील लढतीत झालेल्या पराभवामुळे त्यांचा नेट रन रेट नकारात्मक झाला आहे. त्यामुळे त्यांना अखेरच्या लढतीत विजय मिळवावा लागेलच, शिवाय दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स व राजस्थान रॉयल्स  यांच्या पराभवाची प्रतीक्षा पाहावी लागेल. त्यामुळे आजचा राजस्थानचा पराभव त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.
  • पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांनी १२ सामन्यांत प्रत्येकी १४ गुण कमावले आहेत. या दोघांनी उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर ते १६ गुण कमवू शकतात. पण, तसे न झाल्यास फक्त १ सामना जिंकला तर त्यांची गुणसंख्या १४ होईल आणि अशा वेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल. त्यांची थेट स्पर्धा ही राजस्थानशी होईल. राजस्थान १४ गुणांसह व उत्तम नेट रन रेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • सनरायझर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यासाठीही राजस्थानचा पराभव फायद्याचा ठरणार आहे  
टॅग्स :आयपीएल २०२२राजस्थान रॉयल्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App