Join us  

KL Rahul IPL 2022 LSG vs KKR Live Updates : एकही चेंडू न खेळता लोकेश राहुल भोपळ्यावर माघारी परतला; Shreyas Iyerच्या 'बुलेट थ्रो' ने गेम केला, Video 

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला आजच्या सामन्यात अपेक्षित सुरुवात करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 8:26 PM

Open in App

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला आजच्या सामन्यात अपेक्षित सुरुवात करता आली नाही. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, प्रमुख गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याशिवाय KKRला मैदानावर उतरावे लागले. उमेशच्या जागी हर्षित राणाला संधी मिळाली आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत काठावर बसलेल्या लखनौला आता प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. कोलकाताही समान बाकावर आहे, परंतु त्यांच्या प्ले ऑफच्या आशा अंधुक आहेत. मात्र, पहिल्याच षटकात त्यांनी LSG चा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याची विकेट मिळवून मोठे यश प्राप्त केलं. KKRचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याच्या बुलेट थ्रो मुळे एकही चेंडू न खेळता लोकेशला तंबूत जावे लागले. 

लखनौचा कर्णधार लोकेश राहुल, दीपक हुडा, कृणाल पांड्या, क्विंटन डी कॉर, आयुष बदोनी यांनी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. लोकेशचा फॉर्म पाहता तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या जोस बटलरला कडवी टक्कर देतोय... मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही, पण त्यांचे योगदान नाकारण्यासारखे नक्की नाही. मोहसिन खान व दुष्मंथा चमिरा हे सप्राईज पॅकेज ठरलेत. रवी बिश्नोईनेही अधुनमधून छाप पाडली आहे. दुसरीकडे, कोलकाताला अद्याप सांघिक कामगिरी करता आलेली नाही. श्रेयस अय्यर व मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या वादाच्या चर्चा सुरू आहेत आणि त्याचा फटका संघाला बसतोय. आजही चांगली सुरुवात करूनही ते बॅकफूटवर फेकले गेले.

पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर क्विंटन डी कॉकने फटका मारला. क्विंटन व लोकेश दोघंही रन घेण्यासाठी पळाले, परंतु क्विंटनने माघारी जाण्याचा इशारा केला. तोपर्यंत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने बुलेट थ्रो केला व लोकेशला रन आऊट होऊन माघारी जावे लागले. पण, क्विंटन व दीपक हुडा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. लोकेशच्या विकेटनंतर क्विंटनने जबाबदारीने खेळ करताना २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५० धावा केल्या. सुनील नरीनने ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर दीपकने फटकेबाजी सुरू ठेवली. ( पाहा IPL 2022 - LSG vs KKR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड

पाहा विकेट

टॅग्स :आयपीएल २०२२श्रेयस अय्यरलोकेश राहुललखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App