Shubman Gill  IPL 2022, LSG vs GT Live Updates : लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची भारी कामगिरी, शुबमन गिलने गुजरात टायटन्सची लाज वाचवली! 

IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : शुबमन गिल ( Shubman Gill ) व डेव्हिड मिलर ( David Miller ) या जोडीने गुजरात टायटन्सची घसरलेली गाडी रुळावर आणली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 09:14 PM2022-05-10T21:14:27+5:302022-05-10T21:14:59+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, LSG vs GT Live Updates :Lucknow Supergiants need 145 to become first team to qualify for IPL 2022 Playoffs. | Shubman Gill  IPL 2022, LSG vs GT Live Updates : लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची भारी कामगिरी, शुबमन गिलने गुजरात टायटन्सची लाज वाचवली! 

Shubman Gill  IPL 2022, LSG vs GT Live Updates : लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची भारी कामगिरी, शुबमन गिलने गुजरात टायटन्सची लाज वाचवली! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : शुबमन गिल ( Shubman Gill ) व डेव्हिड मिलर ( David Miller ) या जोडीने गुजरात टायटन्सची घसरलेली गाडी रुळावर आणली. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना गुजरातचे तीन फलंदाज ५१ धावांवर माघारी पाठवले होते. हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya) खराब फॉर्म याही सामन्यात कायम राहिला. मागील ६ सामन्यांत त्याला ९ च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत. गिलने यंदाच्या पर्वातील चौथे अर्धशतक झळकावताना मिलरसह गुजरातच्या डावाला आकार दिला आणि समाधानकारक पल्ला गाठून दिला. 


गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून पुन्हा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांची सुरुवात काही खास झाली नाही. पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी धावा त्यांनी या सामन्यात केल्या. लखनौच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी बजावताना पहिल्या १० षटकांत गुजरातच्या तीन प्रमुख फलंदाजांना बाद केले. शुबमन गिलला पहिल्या षटकाच्या अखेरच्या ( झेल सोडला) व दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ( रन आऊट) जीवदान मिळाले. वृद्धीमान सहालाही तिसऱ्या षटकात नशिबाने साथ दिली, परंतु पुढच्याच चेंडूवर मोहसिन खानने त्याला माघारी पाठवले. गुजरातला ८ धावांवर पहिला धक्का बसला.  


मॅथ्यू वेडने मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करताना दोन खणखणीत चौकार खेचले, पण आवेश खानच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो ( १०) यष्टिरक्षकाकडे झेल देऊन माघारी परतला. १३ धावावंर गिलला ( रन आऊट) पुन्हा जीवदान मिळाले. आयुष बदोनीने ही संधी गमावली. लखनौच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना गुजरातला पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ धक्के दिले अन् ३५ धावाच करू दिल्या. गुजरातची ही पॉवर प्लेमधील खराब कामगिरी ठरली. गिल व हार्दिक पांड्या डोईजड झाली होती, परंतु १०व्या षटकात आवेश खानने GT ला मोठा धक्का दिला. हार्दिक ११ धावांवर बाद झाला. 


गिल खेळपट्टीवर होता, पण गुजरातच्या धावा काही वेगाने वाढताना दिसल्या नाही. लखनौच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. १६व्या षटकात गुजरातने तिहेरी आकडा गाठला. गिल व डेव्हिड मिलर आता धावांचा वेग वाढवताना दिसले. या जोडीने ४० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. जेसन होल्डरने स्लो बाऊन्सरवर मिलरला चकवले अन् २६ धावांवर माघारी पाठवले. गिलने ४२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे १४ वे अर्धशतक ठरले. आवेशने टाकलेल्या १९व्या षटकात लखनौच्या खेळाडूंनी दोन झेल सोडले. आवेशने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. मोहसिनने १८ धावांत १ विकेट घेतली. गिल ४९ चेंडूंत ७ चौकारांसह ६३ धावांवर नाबाद राहिला. राहुल तेवातियाने १५ चेंडूंत २२ धावा चोपल्या. गुजरातने ४ बाद १४४ धावा केल्या. 

Web Title: IPL 2022, LSG vs GT Live Updates :Lucknow Supergiants need 145 to become first team to qualify for IPL 2022 Playoffs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.