David Warner IPL 2022 LSG vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर परतला, पृथ्वी शॉसोबत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला; नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजूने लागला 

IPL 2022 Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Updates : लोकेश राहुल व रिषभ पंत हे टीम इंडियाचे दोन भावी कर्णधार आज इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात एकमेकांसमोर मैदानावर उतरणार आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:08 PM2022-04-07T19:08:13+5:302022-04-07T19:18:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 LSG vs DC Live Updates : Lucknow won the toss and decided to bowl first, David Warner, Sarfaraz Khan, Anrich Nortje playing for Delhi X1. | David Warner IPL 2022 LSG vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर परतला, पृथ्वी शॉसोबत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला; नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजूने लागला 

David Warner IPL 2022 LSG vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर परतला, पृथ्वी शॉसोबत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला; नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजूने लागला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Updates : लोकेश राहुल व रिषभ पंत हे टीम इंडियाचे दोन भावी कर्णधार आज इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात एकमेकांसमोर मैदानावर उतरणार आहेत. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( LSG vs DC) असा सामना आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.  लखनौने तीन पैकी दोन सामने, तर दिल्लीने दोनपैकी एक सामना जिंकला आहे. पण, डेव्हिड वॉर्नर व एनरिच नॉर्खिया यांचे पुनरागमन होत असल्याने आजच्या सामन्यातील चुरस आणखी वाढली आहे. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीच्या ताफ्यात वॉर्नरसह एनरिच नॉर्खिया याचेही अंतिम ११मध्ये पुनरागमन झाले आहे.  वॉर्नरने क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे, तर नॉर्खिया दुखापतीतून सावरला आहे. दिल्लीने आज तीन बदल केले आहेत. डेव्हिड वॉर्नर, सर्फराज खान आणि नॉर्खिया हे आज अंतिम ११ मध्ये खेळणार आहेत. लखनौच्या ताफ्यात एक बदल झाला असून मनीष पांडेच्या जागी कृष्णप्पा गौथमला खेळवले आहे. मार्कस स्टॉयनिस आज खेळणार नाही.  

लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुल, क्विंटन डी कॉक, एव्हिन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, अँड्य्रू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान  ( LSG playing 11: KL Rahul(c), Quinton de Kock(w), Evin Lewis, Deepak Hooda, Ayush Badoni, Krunal Pandya, Jason Holder, Krishnappa Gowtham, Andrew Tye, Ravi Bishnoi, Avesh Khan )     

दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सर्फराज खान, रिषभ पंत, ललित यादव, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्खिया, मुस्ताफिजूर रहमान ( Delhi Capitals (Playing XI): Prithvi Shaw, David Warner, Rishabh Pant(w/c), Rovman Powell, Sarfaraz Khan, Lalit Yadav, Axar Patel, Shardul Thakur, Kuldeep Yadav, Mustafizur Rahman, Anrich Nortje)  

Web Title: IPL 2022 LSG vs DC Live Updates : Lucknow won the toss and decided to bowl first, David Warner, Sarfaraz Khan, Anrich Nortje playing for Delhi X1.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.