Join us

IPL 2022 LSG vs DC Live Updates : २०१६मध्ये १९वर्षांखालील भारतीय संघातील जोडी सुसाट सुटली; दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या वेगाने वाढवली

लोकेश राहुल व रिषभ पंत हे टीम इंडियाचे दोन भावी कर्णधार इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात एकमेकांसमोर मैदानावर उतरले. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 21:18 IST

Open in App

IPL 2022 Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Updates : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) च्या धडाक्यानंतर कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant)  व सर्फराज खान ( Sarfaraz Khan) यांनी दिल्ली कॅपिटल्सला ( DC) सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. पृथ्वी मैदानावर असेपर्यंत लखनौ सुपर जायंट्सचे ( LSG) गोलंदाज तव्यावर होते, परंतु त्याची विकेट पडली अन् दिल्लीची गळती सुरू झाली. मात्र, २०१६च्या १९वर्षांखालील भारतील संघातील दोन फलंदाज मैदानावर शड्डू ठोकून उभे राहिले आणि दिल्लीला कमबॅक करून दिले. 

आयपीएल २०२२त पहिलाच सामना खेळणारा डेव्हिड वॉर्नर सावध पवित्र्यात होता. ९ वर्षांनंतर वॉर्नर दिल्ली फ्रँचायझीच्या ताफ्यात परतला आहे. पृथ्वी शॉ मात्र आक्रमणाच्या तयारीतच होता. त्याने आवेश खानच्या एका षटकात सलग तीन चौकार खेचले. पृथ्वीची फटकेबाजी पाहून लोकेश राहुलन पहिल्या ६ षटकांत पाच गोलंदाज बदलले. पृथ्वीने ३० चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. ८व्या षटकात गौथमच्या पहिल्या दोन चेंडूवर पृथ्वीने षटकार व चौकार खेचला, परंतु तिसऱ्या चेंडूवर गौथमने त्याची विकेट घेतली. पृथ्वी ३४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. पुढच्या षटकात वॉर्नर ( ४) रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बदोनीच्या हाती सोपा झेल देऊन बसला.सलग दोन विकेट्सनंतर दिल्लीचा खेळ थोडा मंदावला अन् त्याच दडपणात आणखी एक विकेट गमावली. रोव्हमन पॉवेल ३ धावांवर बिश्नोईच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. रिषभ पंत व सर्फराज खान यांनी घाई करण्याचा मोह टाळला आणि संघाची धावसंख्या हलती ठेवली. १५व्या षटकानंतर रिषभने गिअर बदलला आणि अँड्य्रू टायच्या षटकात चौकार व षटकार खेचले. रिषभने १६व्या षटकात १८ धावा जोडल्या. २०१६च्या १९वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत रिषभ व सर्फराज एकत्र खेळले होते आणि ६ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा मैदानावर धुमाकूळ घालताना दिसली.  रिषभ व सर्फराज यांनी ५७ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली आणि संघाला ३ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली. जेसन होल्डरने अखेरची दोन षटकं सुरेख फेकली. रिषभ ३९ व सर्फराज ३६ धावांवर नाबाद राहिले. 

टॅग्स :आयपीएल २०२२रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्सपृथ्वी शॉ
Open in App