IPL 2022 Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Updates : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) च्या धडाक्यानंतर कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) व सर्फराज खान ( Sarfaraz Khan) यांनी दिल्ली कॅपिटल्सला ( DC) सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. पृथ्वी मैदानावर असेपर्यंत लखनौ सुपर जायंट्सचे ( LSG) गोलंदाज तव्यावर होते, परंतु त्याची विकेट पडली अन् दिल्लीची गळती सुरू झाली. मात्र, २०१६च्या १९वर्षांखालील भारतील संघातील दोन फलंदाज मैदानावर शड्डू ठोकून उभे राहिले आणि दिल्लीला कमबॅक करून दिले.
![]()
आयपीएल २०२२त पहिलाच सामना खेळणारा डेव्हिड वॉर्नर सावध पवित्र्यात होता. ९ वर्षांनंतर वॉर्नर दिल्ली फ्रँचायझीच्या ताफ्यात परतला आहे. पृथ्वी शॉ मात्र आक्रमणाच्या तयारीतच होता. त्याने आवेश खानच्या एका षटकात सलग तीन चौकार खेचले. पृथ्वीची फटकेबाजी पाहून लोकेश राहुलन पहिल्या ६ षटकांत पाच गोलंदाज बदलले. पृथ्वीने ३० चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. ८व्या षटकात गौथमच्या पहिल्या दोन चेंडूवर पृथ्वीने षटकार व चौकार खेचला, परंतु तिसऱ्या चेंडूवर गौथमने त्याची विकेट घेतली. पृथ्वी ३४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. पुढच्या षटकात वॉर्नर ( ४) रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बदोनीच्या हाती सोपा झेल देऊन बसला.
सलग दोन विकेट्सनंतर दिल्लीचा खेळ थोडा मंदावला अन् त्याच दडपणात आणखी एक विकेट गमावली. रोव्हमन पॉवेल ३ धावांवर बिश्नोईच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. रिषभ पंत व सर्फराज खान यांनी घाई करण्याचा मोह टाळला आणि संघाची धावसंख्या हलती ठेवली. १५व्या षटकानंतर रिषभने गिअर बदलला आणि अँड्य्रू टायच्या षटकात चौकार व षटकार खेचले. रिषभने १६व्या षटकात १८ धावा जोडल्या. २०१६च्या १९वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत रिषभ व सर्फराज एकत्र खेळले होते आणि ६ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा मैदानावर धुमाकूळ घालताना दिसली.
रिषभ व सर्फराज यांनी ५७ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली आणि संघाला ३ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली. जेसन होल्डरने अखेरची दोन षटकं सुरेख फेकली. रिषभ ३९ व सर्फराज ३६ धावांवर नाबाद राहिले.
Web Title: IPL 2022 LSG vs DC Live Updates : 2016 U-19 batch batting together for Delhi Capitals, Rishabh Pant and Sarfaraz Khan; set 150 runs target to Lucknow Super Giants
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.