Join us  

IPL 2022: आयपीएल 2022 च्या सलामीला मुंबई-चेन्नई भिडणार? BCCI चं वेळापत्रक आलं समोर, धोनी सलामीचा सामना खेळणार 

IPL 2022: आयपीएल 2022 च्या (IPL 2022) सीजनमध्ये 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 11:59 AM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएल 2022 चे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होऊ शकतो. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK)आयपीएल 2021 चे (IPL 2021) विजेतेपद पटकावले. त्यामुळे गतविजेता असल्याने त्याला सलामीच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) सीजनमध्ये 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरतील. आयपीएलमध्ये 2 नवीन संघ आल्याने आता सामन्यांची संख्या वाढवली जाणार आहे. ही संख्या 60 वरून 74 वर होईल. दरम्यान, यावेळी बीसीसीआयने (BCCI) पुढील आयपीएलचा संपूर्ण सीजन देशातच होणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.

Cricbuzz च्या वृत्तानुसार, आयपीएल 2022 चा (IPL 2022) सीजन 2 एप्रिलपासून सुरू होऊ शकतो. पहिला सामना चेन्नईत (Chennai) होणार आहे. या सीजनमध्ये सामने वाढल्यामुळे ही लीग 60 दिवसांपेक्षा जास्त दिवस चालू शकते. 4 किंवा 5 जूनला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. मात्र, सर्व संघांना पूर्वीप्रमाणे 14-14 सामने खेळावे लागणार आहेत. 7 सामने घरच्या मैदानावर तर 7 सामने घराबाहेर खेळवले जातील.

सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना कोणत्या संघाशी होईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण पूर्वीप्रमाणेच चेन्नईची लढत मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma)नेतृत्वाखाली मुंबईने सर्वाधिक वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर चेन्नईने 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे.

आयपीएल 2020 चा संपूर्ण सीजन यूएईमध्ये ( UAE) आयोजित करण्यात आला होता, तर आयपीएल 2021 चा निम्मा सीजनही यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता, मात्र बीसीसीआयचे सचिव जय शहा  (Jay Shah) यांनी पुढील आयपीएलचा सीजन देशातच होणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. अहमदाबाद आणि लखनऊ हे 2 नवीन संघ आयपीएलमध्ये सामील झाले आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App