Shashank Singh IPL 2022 KKR vs SRH Live Updates : अजिंक्य रहाणेच्या खेळीला शशांक सिंगने फुलस्टॉप लावला; कसला अफलातून झेल घेतला, Video 

या सामन्यात शशांक सिंगने ( Shashank Singh) सीमारेषेवर घेतलेला झेल अफलातून ठरला, महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही त्याचे कौतुक केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 10:09 PM2022-05-14T22:09:56+5:302022-05-14T22:10:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 KKR vs SRH Live Updates : Super catch from Shashank Singh, Send Ajinkya Rahane Back To The Pavilion, See Sachin Tendulkar reaction, Video  | Shashank Singh IPL 2022 KKR vs SRH Live Updates : अजिंक्य रहाणेच्या खेळीला शशांक सिंगने फुलस्टॉप लावला; कसला अफलातून झेल घेतला, Video 

Shashank Singh IPL 2022 KKR vs SRH Live Updates : अजिंक्य रहाणेच्या खेळीला शशांक सिंगने फुलस्टॉप लावला; कसला अफलातून झेल घेतला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : सनरायझर्स हैदराबादने उम्रान मलिकच्या ( Umran Malik) दोन षटकांत सामना फिरवला व कोलकाता नाईट रायडर्सला बॅकफूटवर फेकले. वेंकटेश अय्यर दुर्दैवीरित्या आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणे व नितिश राणा यांनी KKRचा डाव सारवला होता. पण, उम्रान मलिकने एकाच षटकात या दोघांना माघारी पाठवले आणि पुढच्या षटकात श्रेयस अय्यरची विकेट घेतली. उम्रानच्या वेगवान माऱ्यासमोर हतबल झालेल्या KKRचा डाव आंद्रे रसेल ( Andre Russell ) व सॅम बिलिंग्सने ( Sam Billings) सावरला आणि SRH समोर तगडे आव्हान उभे केले. या सामन्यात शशांक सिंगने ( Shashank Singh) सीमारेषेवर घेतलेला झेल अफलातून ठरला, महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही त्याचे कौतुक केले.  ( पाहा IPL 2022 - KKR vs SRH  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)

KKR ने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५५ धावा केल्या. नितिश राणा आणि अजिंक्य यांची ३३ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी उम्रान मलिकने संपुष्टात आणली. नितिश १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावांवर बाद झाला. मलिकने अजिंक्य ( २८) व श्रेयस अय्यर ( १५) यांची विकेट घेतली. रिंकू सिंगची ( ५) बॅट आज तळपली नाही. KKR चा निम्मा संघ ९४ धावांवर माघारी परतला. सॅम बिलिंग्स व आंद्रे रसेल यांनी KKR चा डाव पुन्हा रुळावर आणला. भुवनेश्वर कुमारने १९व्या षटकात बिलिंग्सला ( ३४)  बाद केले.

रसेलसोबत त्याची भागीदारी ६४ धावांवर संपुष्टात आली. भुवीने ४ षटकांत २७ धावा देताना एक विकेट घेतली. टी नटराजननेही ( १-४३) व मार्को येनसेन ( १-३०) यांनी एक विकेट घेतली. उम्रानने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या २०व्या षटकात रसेलने तीन खणखणीत षटकार खेचून २० धावा जोडल्या. कोलकाताने ६ बाद १७७ धावा केल्या. रसेल २८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिला. 


अभिषेक शर्मा व केन विलियम्सन यांनी सावध सुरूवात केली. वर्मा अधूनमधून फटकेबाजी करत होता, तर केननं एका बाजून विकेट टिकवून ठेवली होती. पण, सहाव्या षटकात आंद्रे रसेलला गोलंदाजीला आणले आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर केनला ( ९) माघारी पाठवले.         
 

Web Title: IPL 2022 KKR vs SRH Live Updates : Super catch from Shashank Singh, Send Ajinkya Rahane Back To The Pavilion, See Sachin Tendulkar reaction, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.