IPL 2022 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने ( KKR) उत्तम सांघिक कामगिरी करताना आज सनरायझर्स हैदराबादवर ( SRH) विजय मिळवला. SRHचा हा सलग पाचवा पराभव ठरला, तर KKR ने विजयासह प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. आंद्रे रसेल ( Andre Russell) आजच्या सामन्यातील नायक ठरला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर KKR ने हा विजय मिळवला. केन विलियम्सनचे अपयश ही खरी SRH ची डोकेदुखी ठरतेय. या पर्वात त्याला १९च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत.
कोलकाताने उभ्या केलेल्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला अपेक्षित सुरूवात करता आली नाही. केन विलियम्सनचे अपयश ही SRH ची डोकेदुखीच बनली आहे. पॉवर प्लेमध्ये जिथे धावा करण्याचा स्कोप असतो तिथे केन संथ खेळून सहा षटकं वाया घालवताना दिसला. आजही तेच घडले. आंद्रे रसेलने ६व्या षटकात केनला ( ९) माघारी पाठवले. अभिषेक वर्माने सुनील नरीच्या षटकात दोन खणखणीत षटकार मारून SRHकडून संघर्ष सुरू ठेवलेला. राहुल त्रिपाठी आजतरी खेळेल ही अपेक्षा पुन्हा फोल ठरली. टीम साऊदीने रॉकेट कॅच घेत त्रिपाठीला (९) बाद केले. अभिषेकची झुंझार खेळी वरुण चक्रवर्तीने संपुष्टात आणली. अभिषेकने २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. निकोलस पूरन व सुनील नरीन यांच्या सामन्यात KKRच्या गोलंदाजाने बाजी मारली. पूरनला (२) त्याने बाद केले.
७६ धावांत आघाडीचे फलंदाज माघारी परतल्याने SRH अडचणीत आले. त्यात चांगला खेळ करणाऱ्या एडन मार्करामला KKRचा प्रमुख गोलंदाज उमेश यादवने बाद केले. मार्करम २५ चेंडूंत ३२ धावांवर त्रिफळाचीत झाला आणि ५ बा ९९ अशी त्यांची अवस्था झाली. उमेशने ४ षटकांत १९ धावा देत १ विकेट घेतली. आंद्रे रसेलने पुन्हा एक धक्का देताना वॉशिंग्टन सुंदरची ( ४) विकेट घेत KKRचा विजय पक्का केला. मार्को येनसेनही ( १) रसेलच्या त्याच षटकात बाद झाला. टीम साऊदीने १९व्या षटकात शशांक सिंगला ( ११) बाद केले. साऊदीने २३ धावांत २ विकेट घेतल्या. हैदराबादला ८ बाद १२३ धावा करता आल्या आणि कोलकाताने ५४ धावांनी सामना जिंकला. रसेलने २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.