IPL 2022 Rinku Singh: भलेही केकेआरच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी रिंकू सिंहने आपल्या सर्वोत्तम खेळीने चाहत्यांची मने जिंकली. रिंकू सिंगने १५ चेंडूत ४० धावांची खेळी खेळली आणि या खेळीत त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. एक अशी वेळ होती जेव्हा रिंकू सिंह केकेआरला विजय मिळवून देईल असे वाटत होते. पण शेवटच्या षटकात एविन लुईसने अप्रतिम झेल घेतला.
आऊट झाल्यानंतर रिंकू सिंह निराश दिसला, तसंच केकेआरला दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रूही आले. अखेरच्या चेंडूवर केकेआरला तीन धावांची गरज होती. परंतु उमेश यादवनं अखेरच्या चेंडूचा सामना केला. परंतु गोलंदाजानं यॉर्कर टाकत त्याला बाद केलं.
अखेरच्या ओव्हरमध्ये केकेआरला २१ धावांची गरज होती. स्टोयनिसच्या पहिल्या चेंडूवर रिंकूनं चौकर ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि पुन्हा तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याच्या या खेळीनं केकेआरला विजयाच्या जवळ आणलं होतं. चौथ्या चेंडूवरही त्यानं दोन धावा केल्या.
लुईसचा कमाल कॅचस्टॉयनिसच्या पाचव्या चेंडूवर रिंकूनं हवेत शॉट मारला. डीप बॅकवर्ड पॉईंटा असलेल्या इविन लुईसनं त्याचा कमाल कॅच घेतला. त्याचा हा कॅच पाहून सर्वच जण हैराण होते.