IPL 2022, Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore Live Updates : विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म आज परतलेला पाहून सारे सुखावले... विराटचे फटके आज पाहण्यासारखे होते... अल्झारी जोसेफला मारलेला कव्हर ड्राईव्ह, ल्युकी फर्ग्युसनच्या फुलटॉसवर खेचलेला षटकार अन् अपर कट... आज गुजरात टायटन्सवर विराटची बॅट बरसली. विराटने आयपीएल २०२२मधील पहिले अर्धशतक झळकावले. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का शर्माही ( Anushka Sharma) मैदानावर आली होती आणि विराटच्या अर्धशतकानंतर तिचे सेलिब्रेशन व्हायरल झाले.
गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( GT vs RCB) यांच्यातल्या आजच्या सामन्याच्या पहिल्याच षटकात नाट्यमय घडामोड घडली. विराट कोहली स्ट्राईकवर होता आणि शमीने टाकलेला पहिला चेंडू त्याने सुरेखरित्या डिफेन्ड केला. त्यानंतर शमी गोलंदाजी करताना दोनवेळा क्रीजजवळ येऊन थांबला. त्याने लगेचच Measure Tape मागवली अन् तो रनिंगचे माप घेऊ लागला. पहिल्याच षटकात शमीच्या या वेळखाऊ वागण्यावर अम्पायरने नाराजी व्यक्त केली. माप मोजून झाल्यानंतर शमीने टाकलेल्या पुढील दोन चेंडूंवर विराटने चौकार खेचले.
विराट ४५ धावांवर असताना राशिदने त्याच्याच गोलंदाजीवर झेल सोडला. त्यानंतर विराटने आयपीएल २०२२मधील पहिले अर्धशतक झळकावले.
पाहा व्हिडीओ...विराट कोहलीचे हे आयपीएलमधील ४३ वे अर्धशतक ठरले.