Rahul Tewatia IPL 2022 GT vs PBKS Live Updates : राहुल तेवातियाने २ चेंडूंत निकाल लावला; Shubman Gillची ९६ धावांचा मान राखून विजयी षटकार खेचला 

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : शुबमन गिलने ( Shubman Gill) एकहाती खिंड लढवूनही गुजरात टायटन्सला विजयासाठी अखेरच्या षटकार्यंत संघर्ष करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 11:36 PM2022-04-08T23:36:39+5:302022-04-08T23:37:21+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 GT vs PBKS Live Updates : Shubman Gill goes for 96 runs from 59 balls, Gujarat Titans need 12 from 2 and Rahul Tewatia has hit a six  | Rahul Tewatia IPL 2022 GT vs PBKS Live Updates : राहुल तेवातियाने २ चेंडूंत निकाल लावला; Shubman Gillची ९६ धावांचा मान राखून विजयी षटकार खेचला 

Rahul Tewatia IPL 2022 GT vs PBKS Live Updates : राहुल तेवातियाने २ चेंडूंत निकाल लावला; Shubman Gillची ९६ धावांचा मान राखून विजयी षटकार खेचला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : शुबमन गिलने ( Shubman Gill) एकहाती खिंड लढवूनही गुजरात टायटन्सला विजयासाठी अखेरच्या षटकार्यंत संघर्ष करावा लागला. पंजाब किंग्सने विजयासाठी ठेवलेल्या १९० धावांच्या प्रत्युत्तरात गिलने खणखणीत शतक झळकावले. त्याला साई सुदर्शनची ( Sai Sudharsan ) तुल्यबळ साथ मिळाली आणि या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण, अखेरच्या षटकांत गुजरातने विकेट गमावल्या आणि सामना अतिटतीचा झाला. २ चेंडूंत १२ धावांची गरज असताना राहुल तेवातिया ( Rahul Tewatia) धावून आला आणि त्याने दोन चेंडूंत पंजाब किंग्सच्या हातून सामना हिसकावून घेतला.

प्रत्युत्तरात शुबमन गिलने चांगली सुरुवात केली, परंतु मॅथ्यू वेडला (  ६) पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. कागिसो रबाडाने त्याच्या पहिल्याच षटकात वेडची विकेट काढली. गिल व पदार्पणवीर साई सुदर्शन यांनी खणखणीत फटकेबाजी केली. गिलने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, त्याला सुदर्शननेही मस्त साथ दिली. पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या सुदर्शनचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता. सुदर्शनने दुसऱ्या विकेटसाठी गिलसोबत ६८ चेंडूंत १०१ धावांची भागीदारी केली. राहुल चहरने ही जोडी तोडली. सुदर्शन ३० चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३५ धावांवर झेलबाद झाला. 


९० धावांवर असताना गिलला यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकडून जीवदान मिळाले. राहुल चहरच्या त्याच षटकात हार्दिक पांड्याचा झेल कागिसो रबाडाने सोडला. १७व्या षटकात या दोन्ही विकेट मिळाल्या असत्या तर पंजाबचा मार्ग सोपा झाला असता. गुजरातला १८ चेंडूंत ३७ धावांची गरज होती. अर्षदीपने १८व्या षटकात केवळ ५ धावा दिल्या. १९व्या षटकात रबाडाने चार चेंडूंत ११ धावा दिल्याने पंजाब तणावाखाली गेले, परंतु पाचव्या चेंडूवर चतुराईने त्याने शुबमन गिलला बाद केले, गिलचे शतक हुकले आणि तो ५९ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ९६ धावांवर माघारी परतला.

गुजरातला ६ चेंडूंत १९ धावांची गरज होती. ओडिन स्मिथने wide चेंडूने २०व्या षटकाची सुरूवात केली. त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर डेव्हिड मिलर फटका मारण्यापासून चुकला आणि चेंडू यष्टिरक्षक बेअरस्टोच्या हाती असताना नॉन स्ट्रायकर एंडवरून हार्दिक धाव घेण्यासाठी पळाला. पण, बेअरस्टोने त्याला ( २७) धावबाद केले.   २ चेंडूंत १२ धावा हव्या असताना राहुल तेवातियाने दोन खणखणीत षटकार खेचले व गुजरातने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. 

तत्पूर्वी, पंजाब किंग्सची सुरुवात फार चांगली झाली नाही. मयांक अग्रवाल ( ५) व जॉनी बेअरस्टो लगेच माघारी परतले. शिखर धवन ( ३५) व लिव्हिंगस्टोन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ५२ धावा जोडल्या. लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूत ५०+ धावा करून यंदाच्या आयपीएलमधील दुसरे जलद अर्धशतक पूर्ण केले. जितेश शर्माने ताबडतोड ११ चेंडूंत २३ धावा ( १ चौकार व २ षटकार) कुटल्या. पदार्पणवीर दर्शन नळकांडेने त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. दर्शनने पुढच्याच चेंडूवर ओडीन स्मिथला ( ०) बाद करून पंजाबला मोठा धक्का दिला. १५ षटकांत पंजाबने ५ बाद १५२ धावा केल्या होत्या. 

१६व्या षटकात राशिद खानने कमाल केली. त्याने खतरनाक लिव्हिंगस्टोन व  शाहरूख खान यांना एकामागोमाग बाद केले. लिव्हिंगस्टोनने २७ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावा केल्या, तर शाहरूख ८ चेंडूंत २ षटकारांसह १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर कागिसो रबाडा ( १) रन आऊट झाल्याने पंजाब पुन्हा बॅकफूटवर फेकले गेले. मोहम्मद शमीने सामन्यातील ९वी विकेट घेताना वैभव अरोराला बाद केले. राहुल चहरने काही आडवे-तिडवे फटके मारून पंजाबची धावसंख्या पटापट वाढवली. चहरने १४ चेंडूंत नाबाद २२, तर अर्षदीप सिंगने १० धावा केल्या. पंजाबने ९ बाद १८९ धावा केल्या. 

Web Title: IPL 2022 GT vs PBKS Live Updates : Shubman Gill goes for 96 runs from 59 balls, Gujarat Titans need 12 from 2 and Rahul Tewatia has hit a six 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.