Join us

Darshan Nalkande IPL 2022 GT vs PBKS Live Updates : विदर्भवीर चमकला, दर्शन नळकांडेने पदार्पणात घेतल्या दोन चेंडूंत दोन विकेट्स, Video 

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करूनही पंजाब किंग्सने धक्के दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 21:04 IST

Open in App

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करूनही पंजाब किंग्सने धक्के दिले. पंजाबचे दोन फलंदाज ३४ धावांवर माघारी पाठवल्यानंतर गुजरात सामन्यावर पकड घट्ट करतील असे वाटले होते. पण, शिखर धवन व लाएम लिव्हिंगस्टोन यांनी अर्धशतकी भागीदारी करून पंजाबचा डाव सावरला. गुजरातच्या खेळाडूंनी सोडलेले झेलही पंजाबच्या पथ्यावर पडले. लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना गुजरातचे धाबे दणाणून सोडले होते. पण, विदर्भवीर दर्शन नळकांडेने ( Darshan Nalkande ) सलग दोन विकेट्स घेत सामन्याची चुरस वाढवली. 

पंजाब किंग्सची सुरुवात फार चांगली झाली नाही. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने नव्या चेंडूवर गोलंदाजी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने १४१kmph च्या वेगाने चेंडू टाकून फिटनेस सिद्ध केलीच, शिवाय त्याच्या गोलंदाजीला आज चांगलीच धार दिसली. त्याने  त्याच्या पहिल्याच षटकात पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल (  ५) याला बाद केले. आज पहिलाच सामना खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोचा अडथळा ल्युकी फर्ग्युसनने दूर केला, राहुल तेवातियाने सुरेख झेल टिपला.

शिखर धवन व लिव्हिंगस्टोन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ५२ धावा जोडल्या. धवन ३५ धावांवर राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. जितेश शर्माने ताबडतोड ११ चेंडूंत २३ धावा ( १ चौकार व २ षटकार) कुटल्या. पदार्पणवीर दर्शन नळकांडेने त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. दर्शनने पुढच्याच चेंडूवर ओडीन स्मिथला (  ०) बाद करून पंजाबला मोठा धक्का दिला. दरम्यान, लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूत ५०+ धावा करून यंदाच्या आयपीएलमधील दुसरे जलद अर्धशतक पूर्ण केले. KKRच्या पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.

पाहा व्हिडीओ...    १६व्या षटकात राशिद खानने कमाल केली. त्याने खतरनाक लिव्हिंगस्टोन व  शाहरूख खान यांना एकामागोमाग बाद केले. लिव्हिंगस्टोनने २७ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावा केल्या, तर शाहरूख ८ चेंडूंत २ षटकारांसह १५ धावांवर बाद झाला. 

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्सपंजाब किंग्स
Open in App