IPL 2023 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Marathi Live : लखनौ सुपर जायंट्सनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धची हातची मॅच गमावली. संथ खेळपट्टीवर जिथे गुजरातचे फलंदाज ढेपाळले, तिथे LSGच्या लोकेश राहुलने ( KL Rahul) चांगली फलंदाजी केली. पण, अखेरच्या षटकात लोकेशची विकेट पडली अन् त्यानंतर मोहित शर्माने ( Mohit Sharma) कमाल केली. LSGचे चार फलंदाज सलग चेंडूंवर बाद झाले अन् GT ने रोमहर्षक विजयाची नोंद केली.
लोकेश राहुल भारताचा 'वेगवान' फलंदाज ठरला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला, जगात तिसरा आला
मोहम्मद शमीने पहिले षटक निर्धाव टाकले. पण, शमीच्या पुढच्याच षटकांत लोकेशने सलग तीन चौकार खेचून १४ धावा कुटल्या. त्याने राशीद खानचेही दोन खणखणीत चौकाराने स्वागत केले. लोकेश हा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ( इनिंग्ज) ७००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. राशीदने सातव्या षटकात LSGला धक्का दिला. मायर्स २४ धावांवर त्रिफळाचीत झाला. राशीदच्या पुढच्या षटकात कृणाल पांड्याने स्वीप मारलेला अन् अभिनवसाठी सोपा झेल होता, परंतु त्याने तो टाकला. राशीद त्यानंतर भडकला. लोकेश आज चांगल्या फॉर्मात खेळताना दिसला आणि त्याने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. लोकेशचा खेळ पाहून कृणालनेही GTच्या फिरकीपटूंवर आक्रमण सुरू केले.
६ चेंडू १२ धावा असा सामना आला. लोकेशने दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु जयंत यादवने झेल टिपला. लोकेश ६१ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६८ धावांवर बाद झाला. मोहितच्या पुढच्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिस झेलबाद झाला आणि ३ चेंडू १० धावा असा सामना रंगला. चौथ्या चेंडूवर दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात आयुष बदोनी ( १०) रन आऊट झाला, पुढच्या चेंडूवर दीपक हुडा रन आऊट झाला. सलग चार विकेट्स पडल्याने लखनौचा पराभव पक्का झाला. गुजरातने ७ धावांनी हा सामना जिंकला अन् LSGला ७ बाद १२८ धावा करता आल्याय
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"