Natasa Stankovic  IPL 2022 GT vs KKR Live Updates : हार्दिक पांड्याची पत्नी भलतीच खूश झाली, KKRच्या विकेटनंतर नताशा स्टँकोव्हिच नाचू लागली, Video Viral 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा हार्दिक पांड्या हा पहिलाच कर्णधार ठरला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 06:03 PM2022-04-23T18:03:12+5:302022-04-23T18:07:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 GT vs KKR Live Updates : Hardik Pandya Wife Natasa Stankovic celebration after sunil narine wickets, Video  | Natasa Stankovic  IPL 2022 GT vs KKR Live Updates : हार्दिक पांड्याची पत्नी भलतीच खूश झाली, KKRच्या विकेटनंतर नताशा स्टँकोव्हिच नाचू लागली, Video Viral 

Natasa Stankovic  IPL 2022 GT vs KKR Live Updates : हार्दिक पांड्याची पत्नी भलतीच खूश झाली, KKRच्या विकेटनंतर नताशा स्टँकोव्हिच नाचू लागली, Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS  Live Updates : हार्दिक पांड्या (  Hardik Pandya) च्या एकाकी संघर्षाच्या जोरावर गुजरात टायटन्सने ९ बाद १५६ धावांचा आव्हानात्मक पल्ला गाठला. टीम साऊदीने तीन विकेट्स घेत गुजरातला आधीच धक्के दिले होते. त्यात आंद्रे रसेलने ( Andre Russell) २०व्या षटकाच्या पहिल्या दोन व शेवटच्या दोन चेंडूंवर विकेट्स घेत इतिहास रचला. प्रत्युत्तलात कोलकाता नाईट रायडर्सचे दोन फलंदाज तीन षटकांत माघारी परतले आणि हार्दिकची पत्नी नताशा स्टँकोव्हिच ( Natasa Stankovic ) हिला आनंद आवरता आला नाही. सुनील नरीनच्या विकेटनंतर तर तिने चक्क डान्सच करायला सुरूवात केली. 

सलामीवीर शुबमन गिल ( ७) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वृद्धीमान सहा (२५) व हार्दिक यांनी डाव सावरण्याच्या प्रयत्न करताना ७५ धावांची भागीदारी केली. डेव्हिड मिलर ( २७) व हार्दिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. टीम साऊदीने १८व्या षटकात हार्दिकला बाद केले. हार्दिकने ४९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्याच षटकात राशिद खान ( ०) बाद झाला. साऊदीने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर आंद्रे रसेलने सलग दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने राहुल तेवातियाची ( १७) विकेटही घेतली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर भन्नाट कॅच घेत आंद्रेने गुजरातची वाट लावली. त्याने २०व्या षटकात ५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. गुजरातला ९ बाद १५६ धावा करता आल्या. 

प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचे दोन्ही सलामीवीर लगेच माघारी परतले. सॅम बिलिंग्स ( ४) व सुनील नरीन ( ५) यांना मोहम्मद शमीने माघारी पाठवले. 


Web Title: IPL 2022 GT vs KKR Live Updates : Hardik Pandya Wife Natasa Stankovic celebration after sunil narine wickets, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.