Join us

IPL 2022, Deepak Chahar : चेन्नई सुपर किंग्ससाठी मोठी बातमी; १४ कोटी मोजलेला दीपक चहर आयपीएलमध्ये खेळणार की नाही?

IPL 2022, Deepak Chahar CSK Squad : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दीपकला १.५ षटक टाकल्यानंतर मैदान सोडावे लागले होते. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार त्याला  क्वाड्रिसिप टीअरची दुखापत झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 10:49 IST

Open in App

IPL 2022, Deepak Chahar CSK Squad : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये गोलंदाज दीपक चहरसाठी सर्वाधिक १४ कोटी रुपये मोजले. हा चहरसाठी सुखद धक्का होता, परंतु वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याला दुखापत झाली आणि CSK ला मोठा धक्का बसला. आयपीएल २०२२साठी ज्याच्यासाठी १४ कोटी मोजले त्याच दीपकच्या खेळण्यावर साशंकता निर्माण झाली होती. पण, बुधवार हा चेन्नई सुपर किंग्ससाठी आनंदाची बातमी घेऊन आला. दीपक चहर एप्रिलच्या मध्यंतरानंतर आयपीएल २०२२ खेळणार आहे आणि त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागणार नाही.  

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दीपकला १.५ षटक टाकल्यानंतर मैदान सोडावे लागले होते. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार त्याला  क्वाड्रिसिप टीअरची दुखापत झाली आहे आणि त्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ८ ते १२ आठवडे दीपकला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार होते. पण, TOI ने दिलेल्या वृत्तानुसार दीपकच्या दुखापतीवर शस्त्रक्रियेची गरज नाही. त्यामुळे तो एप्रिलच्या मध्यंतराला आयपीएल खेळण्यासाठी CSKच्या ताफ्यात दाखल होणार आहे.  

दीपक चहर सध्या बीसीसीआयच्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) आठ आठवड्यांच्या पुनर्वसन कार्यक्रमासाठी दाखल झाला आहे. पण, चहरला NCAतून रिलीज करण्यात यावं अशी विनंती CSKने बीसीसीआयकडे केली आहे. त्याला आयपीएल टीम फिजिओसोबत सराव करण्याची परवानगी CSKने मागितली आहे.  आयपीएल २०२२ साठी चेन्नईचा ताफा सुरतमध्ये दाखल झाला आहे. त्यांचा पहिला सामना २६ मार्चला कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).

चेन्नई सुपर किंग्सचे संपूर्ण वेळापत्रक

२६ मार्च  - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून३१ मार्च - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून३ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून९ एप्रिल -  चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून १२ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून१७ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून२१ एप्रिल -  मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून२५ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून१ मे -  सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून४ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून८ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून१२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून१५ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून२० मे - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्स
Open in App