Jos Buttler IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलर संतापला, बघा रागाच्या भरात काय करून बसला, Video

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी आज सपशेल शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 10:08 PM2022-05-29T22:08:56+5:302022-05-29T22:10:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : angry Jos Buttler’s throw helmet and gloves As He Gets Dismissed For 39 Runs In The IPL 2022 Finals, Video  | Jos Buttler IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलर संतापला, बघा रागाच्या भरात काय करून बसला, Video

Jos Buttler IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलर संतापला, बघा रागाच्या भरात काय करून बसला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी आज सपशेल शरणागती पत्करली. गुजरात टायटन्सचा ( GT) कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) त्यांना तालावर नाचवले. हार्दिकने ४ षटकांत १७ धावा देताना ३ मोठ्या विकेट्स घेतल्या. गुजरातच्या अन्य गोलंदाजांनीही सुरेख कामगिरी करताना राजस्थानच्या धावांवर चाप बसवला. राजस्थान रॉयल्सला जोस बटलरकडून ( Jos Buttler) फार अपेक्षा होत्या. पण, हार्दिकने चतुराईने त्याची विकेट घेतली. RR कडून आयपीएल २०२२ फायनलमध्ये सर्वाधिक धावा करूनही तो संतापला अन् पेव्हेलियनला जाता जाता त्याने राग काढला.  

संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल व जोस बटलर यांनी सावध सुरुवातीवर भर दिला. चौथ्या षटकात यशस्वी ( २२) झेलबाद झाला. ९व्या षटकात हार्दिक पांड्याने  राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन ( १४) बाद केले. जोस बटलर एक बाजू लावून खेळत होता. आयपीएलच्या एका पर्वात ८५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर पहिलाच फलंदाज ठरला. त्याने डेव्हिड वॉर्नरने २०१६मध्ये नोंदवलेला ८४८ धावांचा विक्रम मोडला. विराटने एका पर्वात ९७३ धावा केल्या होत्या. १२व्या षटकात राशिद खानने RRच्या देवदत्त पडिक्कलला ( २) बाद केले आणि पुढच्याच षटकात हार्दिकने जोस बटलरला ( ३९)  बाद केले. बटलरने आयपीएल २०२२त ४ शतकं व ४ अर्धशतकासह ८६३ धावा केल्या. 

त्यानंतर राजस्थानच्या अन्य फलंदाजांना बाद करण्यात गुजरातला फार कष्ट घ्यावे लागले नाही. हार्दिकने त्याच्या चौथ्या षटकात शिमरोन हेटमायरला ( ११) बाद केले. त्यानंतर साई किशोरने RRच्या आऱ अश्विन ( ६) व ट्रेंट बोल्ट (११) यांना माघारी पाठवले. राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या. बटलरने त्याच्या बाद होण्याचा राग काढला आणि हेल्मेट व ग्लोव्ह्ज फेकून राग व्यक्त केला. 


 पाहा जोस बटलरचे कृत्य...
 

Web Title: IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : angry Jos Buttler’s throw helmet and gloves As He Gets Dismissed For 39 Runs In The IPL 2022 Finals, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.