IPL 2022: पराभवाच्या हॅटट्रिकमुळे सीएसकेवर आले दडपण, रवींद्र जडेजानं व्यक्त केली चिंता

IPL 2022: रवींद्र जडेजाने नेतृत्वाची सूत्रे स्वीकारताच आयपीएल १५ मध्ये चेन्नई सुपरकिंग्स ओळीने तिन्ही सामन्यांत पराभूत झाला. यामुळे तो दडपणात असून, विजयाचे खाते उघडण्यासाठी नेमके काय करायला हवे हे सुचेनासे झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 07:48 IST2022-04-05T07:47:47+5:302022-04-05T07:48:23+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2022: Defeat hat-trick puts pressure on CSK, Ravindra Jadeja expresses concern | IPL 2022: पराभवाच्या हॅटट्रिकमुळे सीएसकेवर आले दडपण, रवींद्र जडेजानं व्यक्त केली चिंता

IPL 2022: पराभवाच्या हॅटट्रिकमुळे सीएसकेवर आले दडपण, रवींद्र जडेजानं व्यक्त केली चिंता

मुंबई : रवींद्र जडेजाने नेतृत्वाची सूत्रे स्वीकारताच आयपीएल १५ मध्ये चेन्नई सुपरकिंग्स ओळीने तिन्ही सामन्यांत पराभूत झाला. यामुळे तो दडपणात असून, विजयाचे खाते उघडण्यासाठी नेमके काय करायला हवे हे सुचेनासे झाले आहे. अशा स्थितीत धीर देण्यासाठी अनुभवी महेंद्रसिंग धोनी सोबत आहे, हे भाग्य समजतो, अशी कबुली जडेजाने सोमवारी दिली.

२०२१ चा आयपीएल चॅम्पियन सीएसकेला पहिल्या तिन्ही सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले  आहे. जडेजाकडे संघाचे नेतृत्व असले तरी मैदानावर अनेक निर्णय धोनी स्वत: घेतो.  याच कारणास्तर जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेला जडेजा सीमारेषेजवळही क्षेत्ररक्षण करताना दिसतो. 
लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध लढतीत अखेरच्या षटकांमध्ये धोनी स्वत: निर्णय घेताना दिसला. त्याने शिवम दुबेकडे १९ व्या षटकात चेंडू सोपविला.

रविवारी पंजाब किंग्सविरुद्ध ५४ धावांनी झालेल्या पराभवानंतर जडेजा म्हणाला, लखनऊविरुद्धचा सामना मोठ्या धावसंख्येचा होता. डीप मिडविकेटवर झेल घेण्याची चांगली संधी होती. अशा वेळी आमचा एक क्षेत्ररक्षक तेथे असावा असे वाटत होते. त्यामुळे गोलंदाजांसोबत संवाद साधण्याच्या स्थितीत नव्हतो. धोनीचे सल्ले फार चांगले असतात. त्याला मोठा अनुभव असल्यामुळे सल्ला घेण्यासाठी आम्हाला अन्य कुणाचीही गरज भासत नाही. इतकी वर्षे नेतृत्व करण्याचा अनुभव असलेला धोनी केवळ आमच्या संघात आहे, हे माझे भाग्य.

मानसिकदृष्ट्या तयार होतो
जडेजा म्हणाला, माझ्या नेतृत्वाची सुरुवात खराब झाली, हे खरे आहे. आयपीएल सुरू होण्याआधी नेतृत्वाची जबाबदारी येणार हे कळले त्यावेळी मी मानसिकरीत्या सज्ज होतो. मला महिनाभराआधीच हे सांगण्यात आले होते, तेव्हापासूनच मी तयार होतो. माझ्यावर कुठल्याही प्रकारचे दडपण नव्हते.
एका विजयानंतर चित्र बदलेल
चेन्नईला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. मात्र, एक विजय मिळाल्यास चित्र बदलले, असा विश्वास कर्णधाराने व्यक्त केला. तो म्हणाला, टी-२० त लय प्राप्त करण्यासाठी केवळ एका विजयाची गरज असते.  त्यानंतर विजयी कूच करणे सोपे होते. आम्ही विजयी घोडदौड करण्याच्या दृष्टीने खेळणार आहोत.

Web Title: IPL 2022: Defeat hat-trick puts pressure on CSK, Ravindra Jadeja expresses concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.