IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : आजचा दिवसही जोस बटलरच्या नावावर राहिला. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची कत्तल करताना राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीराने सलग दुसरे शतक झळकावले. त्याने या शतकी खेळीत १८ चेंडूंत ९० धावांचा पाऊस पाडला. त्याने देवदत्त पडिक्कलसह पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची विक्रमी भागीदारी केली. राजस्थान रॉयल्सकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी बेन स्टोक्स व संजू सॅमसन यांनी २०२०मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद १५२ धावांची भागीदारी केली होती. बटलरने यंदाच्या पर्वातील तिसरे शतक झळकावताना विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. बटलरच्या या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानने आज दिल्लीसमोर तगडे आव्हान उभे केले. आयपीएलच्या मागील ८ डावांतील त्याचे हे चौथे शतक ठरले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : जोस बटलरने शतकी खेळीत १८ चेंडूंत कुटल्या ९० धावा; दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा
Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : जोस बटलरने शतकी खेळीत १८ चेंडूंत कुटल्या ९० धावा; दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा
IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : आजचा दिवसही जोस बटलरच्या नावावर राहिला. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची कत्तल करताना राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीराने सलग दुसरे शतक झळकावले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 21:26 IST