Join us  

IPL 2022, DC vs MI : आम्हाला कोणाचे उपकार नको!; दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांचे RCBच्या वर्मी लागणारे ट्विट; नेटिझन्सकडून समाचार 

IPL 2022, DC vs MI : इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये आज प्ले ऑफच्या शर्यतीतील चौथा स्पर्धक ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 4:23 PM

Open in App

IPL 2022, DC vs MI : इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये आज प्ले ऑफच्या शर्यतीतील चौथा स्पर्धक ठरणार आहे. पाच वेळा जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांचा आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. मुंबईने आज बाजी मारावी ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ( RCB) इच्छा आहे आणि त्यांनी मुंबईला पाठींबाही जाहीर केला आहे. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसा यांनी आम्ही दोघंच नव्हे तर संपूर्ण २५ खेळाडू मुंबईसाठी चिअर करणार असल्याचे सांगितले. या सपोर्टनंतर दिल्ली कॅपिटल्सचे सह मालक पार्थ जिंदाल (Delhi Capitals co-owner Parth Jindal ) यांनी RCBच्या वर्मा लागणारे ट्विट केले आहे. त्यावरून नेटिझन्सही खवळले आहेत.

अखेरच्या साखळी सामन्यात RCB ने गुजरात टायटन्सला पराभूत करून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले. आरसीबीच्या विजयामुळे मात्र पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांचे आव्हान संपुष्टात आले. आता आज मुंबई विरुद्ध दिल्ली असा सामना आहे आणि त्यात आम्ही मुंबईला सपोर्ट करणार हे  RCBचा कर्णधार फॅफ ड्यू  प्लेसिस व विराट कोहली यांनी आधीच स्पष्ट केले होते. मुंबईने आज दिल्लीला हरवल्यास RCBचा प्ले ऑफचा मार्ग निश्चित होईल. पण, जर दिल्ली जिंकल्यास समान गुण असूनही उत्तम नेट रन रेटच्या जोरावर रिषभ पंतचा संघ प्ले ऑफमध्ये जाईल. RCB चा नेट रन रेट हा -0.253 असा आहे, तर दिल्लीचा 0.255 आहे. त्यामुळे दिल्लीचा पराभव हा RCB साठी महत्त्वाचा आहे. 

IPL 2022 : पार्थ जिंदाल यांची पत्नी Anushree Jasani यांचे फोटो  सोशल मीडियावर व्हायरल  

 

पार्थ जिंदाल यांनी ट्विट केले की, आमच्यावर कोणी उपकार केलेले आम्हाला आवडणार नाही. गणित सोपं आहे.. आम्ही शनिवारी जिंकणार आणि आयपीएलमध्ये पुढे कूच करणार. जर आम्ही हरलो, तर स्पर्धेबाहेर होऊ आणि मग प्ले ऑफमध्ये खेळण्याचा आम्हाला हक्क नाही. पण, मला माझ्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे.    नेटिझन्सकडून  शाळा    

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्स
Open in App