Join us  

David Warner IPL 2022, DC vs LSG Live Updates : Out or not-out?; डेव्हिड वॉर्नरचा फटका टिपण्यासाठी 'तिने' मोबाईल हाती घेतला, पण आयुष बदोनीनं घोळ घातला, Video 

IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्ने विजयासाठी ठेवलेल्या १९६ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात काही खास झाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 6:10 PM

Open in App

IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्ने विजयासाठी ठेवलेल्या १९६ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात काही खास झाली नाही. पृथ्वी शॉ नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळण्याच्या प्रयत्नात ५ धावांवर माघारी परतला. फॉर्मात असलेल्या डेव्हिड वॉर्नर ( David Warner) कडून अपेक्षा होत्या. पण, तोही ३ धावांवर बाद झाला. त्याची विकेट वादाच्या भवऱ्यात अडकली आहे. मोहसिन खानच्या चेंडूवर वॉर्नरने मारलेला चेंडू आयुष बदोनीने ( Ayush Badoni) टिपला. पण, मैदानावरील अम्पायरने तिसऱ्या अम्पायरची मदत मागितली. बदोनीच्या हातात चेंडू विसावण्यापूर्वी तो मैदानावर टप्पा पडल्याचा त्यांना वाटले. रिप्लेतही तसेच दिसत होते, परंतु बदोनीची दोन बोटं चेंडूच्या खाली असल्याने  वॉर्नरला बाद दिले गेले. या सर्व घडामोडीत वॉर्नरचा फटका कैद करण्यासाठी तरुणीने कॅमेरा बाहेर काढला होता, परंतु बदोनीच्या कॅचने तिचा हिरमोड झाला. 

क्विंटन डी कॉक व लोकेश यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर लोकेश व दीपक हुडा ( Deepak Hooda) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह LSGला मोठी धावसंख्या उभी करून देण्यात हारभार लावला. क्विंटन डी कॉक ( २३) व राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली.  लोकेश आणि दीपक हुडा यांनी धमाल बॅटींग केली. शार्दूल ठाकूरने पुन्हा LSGला धक्का दिला. ३४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांसह लोकेशसोबत ६१ चेंडूंत ९५ धावांची भागीदारी करणाऱ्या दीपक हुडाला त्याने बाद केले. स्वतःच्याच गोलंदाजीवर शार्दूलने मस्त रिटर्न कॅच घेतला. लोकेश ५१ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ७७ धावांवर माघारी परतला. लोकेशच्या विकेटनंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. लखनौला ३ बाद १९५ धावांवर समाधान मानावे लागले. मार्कस  स्टॉयनिसचा ( १७*) खेळ संथ झाला. तीनही विकेट शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) घेतल्या.

दुश्मंथा चमिराने दुसऱ्याच षटकात दिल्लीला धक्का दिला. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर पृथ्वीने पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस चमिराने चेंडूंत थोडासा बदल  केला अन् पृथ्वी ( ५) झेलबाद झाला. डेव्हिड वॉर्नरही ३ धावांवर बाद झाला. मिचेल मार्श व रिषभ पंत यांनी तुफान फटकेबाजी केली. 

 

टॅग्स :आयपीएल २०२२डेव्हिड वॉर्नरदिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App