Join us

KL Rahul IPL 2022, DC vs LSG Live Updates : लोकेश राहुल, दीपक हुडा यांची फटकेबाजी पाहून दिल्लीला घाम फुटला; शार्दूल ठाकूरने तेवढा संघर्ष केला

क्विंटन डी कॉक व लोकेश यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर लोकेश व दीपक हुडा ( Deepak Hooda) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह LSGला मोठी धावसंख्या उभी करून देण्यात हारभार लावला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 17:23 IST

Open in App

IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचं आव्हान लोकेश राहुलने ( KL Rahul)  स्वीकारलं. क्विंटन डी कॉक व लोकेश यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर लोकेश व दीपक हुडा ( Deepak Hooda) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह LSGला मोठी धावसंख्या उभी करून देण्यात हारभार लावला. दिल्लीकडून शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) समाधानकारक कामगिरी केली. त्याने ३ विकेट्स घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत LSG ने पहिले षटक सावधपणे खेळले. त्यानंतर क्विंटन डी कॉक व कर्णधार लोकेश राहुल यांनी फटकेबाजी सुरू केली. चार गोलंदाज वापरून झाल्यानंतर पाचव्या षटकात शार्दूल ठाकूरला बोलावण्याचा निर्णय योग्य ठरला आणि त्याने क्विंटनला ( २३) बाद केले. लोकेश आणि दीपक हुडा यांनी धमाल बॅटींग केली. दोघांनी १०च्या सरासरीने धावांचा ओघ सुरूच ठेवला होता. दिल्लीचा हुकमी एक्का कुलदीप यादव यालाही या जोडीने सोडले नाही. लोकेशने ३५ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले. त्यापाठोपाठ दीपकनेही ३२ धावांत फिफ्टी पूर्ण केली. शार्दूल ठाकूरने पुन्हा LSGला धक्का दिला. ३४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांसह लोकेशसोबत ६१ चेंडूंत ९५ धावांची भागीदारी करणाऱ्या दीपक हुडाला त्याने बाद केले. स्वतःच्याच गोलंदाजीवर शार्दूलने मस्त रिटर्न कॅच घेतला. 

या विकेटनंतर दिल्लीला कमबॅक करण्याची संधी होती, परंतु ललित यादवने आणखी एक झेल सोडला. लोकेशचे फटके आज पाहण्यासारखे होते... पुन्हा एकदा शार्दूल DCसाठी धावून आला. लोकेशने ऑफसाईडच्या दिशेने टोलावलेला चेंडू ललित यावदने अप्रतिमरित्या टिपला. लोकेश ५१ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ७७ धावांवर माघारी परतला. लोकेशच्या विकेटनंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. लखनौला ३ बाद १९५ धावांवर समाधान मानावे लागले. 

टॅग्स :आयपीएल २०२२लोकेश राहुललखनौ सुपर जायंट्सदिल्ली कॅपिटल्सशार्दुल ठाकूर
Open in App