Ruturaj Gaikwad IPL 2022, CSK vs SRH Live Updates : १० Six, १५ Four!; ऋतुराज गायकवाडने पुणे दणाणून सोडले, डेवॉन कॉनवेनेही मैदान गाजवले!

IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पुन्हा  महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) कर्णधारपदी परतला अन् चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंचा फॉर्मही परतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 09:13 PM2022-05-01T21:13:56+5:302022-05-01T21:21:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, CSK vs SRH Live Updates : Ruturaj Gaikwad missed out from a century, Goes for 99 in 57 balls; Devon Conway unbeaten 85 runs from 55 balls, CSK 2/202 | Ruturaj Gaikwad IPL 2022, CSK vs SRH Live Updates : १० Six, १५ Four!; ऋतुराज गायकवाडने पुणे दणाणून सोडले, डेवॉन कॉनवेनेही मैदान गाजवले!

Ruturaj Gaikwad IPL 2022, CSK vs SRH Live Updates : १० Six, १५ Four!; ऋतुराज गायकवाडने पुणे दणाणून सोडले, डेवॉन कॉनवेनेही मैदान गाजवले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पुन्हा  महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) कर्णधारपदी परतला अन् चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंचा फॉर्मही परतला. ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad) घरच्या मैदानावर डरकाळी फोडली आणि त्यासमोर सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. वेगाचा बादशाह उम्रान मलिक ( Umran Malik)  याचे चेंडू अगदी सहजतेने ऋतुराज व डेवॉन कॉनवे टोलावताना दिसले. चेंडूच्या गतीला केवळ दिशा देण्याचं काम या दोघांनी केलं  अन् ही फटकेबाजी पाहून डोळ्यांचे पारणे फेडले... ऋतुराजचे शतक १ धावेने हुकल्याने CSK फॅन्स निराश झाले.  हैदराबादच्या खेळाडूंनी ऋतुराजचे कौतुक करताना त्याची पाट थोपटली. आयपीएलमध्ये १ धावेने शतक हुकणारा तो पाचवा खेळाडू ठरला.  

ऋतुराज व डेवॉन कॉनवे यांनी CSK च्या डावाची दणक्यात सुरुवात केली. कॉनवे नुकताच विवाह बंधनात अडकला अन् सुट्टी संपवून पुन्हा भारतात दाखल झाला. ज्या उम्रान मलिकच्या वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना हैराण केले होते. त्याला आज ऋतुराजने सहज झोडले. मलिकने टाकलेल्या वेगवान चेंडूला योग्य दिशा देण्याचं काम फक्त ऋतुराजने केले. त्यामुळे त्याचे फकटे सहज सुंदर दिसत होते. ऋतुराजने ३८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ६६ धावांची खेळी करताना कॉनवेसह (  २९) पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ऋतुराजने आज आयपीएलमध्ये १००० + धावांचा पल्लाही ओलांडला. त्याने यासाठी केवळ ३१ इनिंग्ज खेळल्या. आयपीएल इतिहासात सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी ऋतुराजने बरोबरी केली.  


ऋतुराजपाठोपाठ कॉनवेनेही ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी १५ षटकांत फलकावर १५३ धावा चढवल्या. यंदाच्या आयपीएलमधील ही तिसरी १५० + धावांची भागीदारी ठरली. याआधी रॉबिन उथप्पा व शिवम दुबे ( वि. RCB) व जोस बटलर व देवदत्त पडिक्कल ( वि. DC) यांनी अशी खेळी केली होती. या जोडीने १६४+ धावा करताच  एबी डिव्हिलियर्स व विराट कोहली  यांचा विक्रम मोडला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आता ऋतुराज व कॉनवे या जोडीच्या नावावर नोंदवला गेला आहे. विराट व एबी यांचा १५७ धावांचा विक्रम आज मोडला गेला. तसंच यंदाच्या आयपीएलमधील ही कोणत्याही विकेटसाठी झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई होत असताना भुवनेश्वर कुमारने ४ षटकांत केवळ २२ धावाच दिल्या. 


९९ धावांवर असणाऱ्या ऋतुराजच्या शतकी धावेची सारेच वाट पाहत होते, पण घडले नको ते. टी नटराजनच्या चेंडूवर ऋतुराजने कट मारला अन् बॅकवर्ड पॉईंटवर असलेल्या भुवनेश्वर कुमारने तो झेलला.ऋतुराज ५७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारासह ९९ धावांवर बाद झाला.त्यानंतर महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला. कॉनवेने ५५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा करताना चेन्नईला २ बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवले. 

Web Title: IPL 2022, CSK vs SRH Live Updates : Ruturaj Gaikwad missed out from a century, Goes for 99 in 57 balls; Devon Conway unbeaten 85 runs from 55 balls, CSK 2/202

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.