Mumbai Indians bow out of IPL 2022 : मुंबई इंडियन्स अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर झाले, जाणून घ्या चेन्नई सुपर किंग्सच्या नशिबी काय राहिले!

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सवर १३ धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 11:35 PM2022-05-04T23:35:46+5:302022-05-04T23:37:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Five time champions Mumbai Indians are the first team to be out of IPL 2022, What about CSK? | Mumbai Indians bow out of IPL 2022 : मुंबई इंडियन्स अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर झाले, जाणून घ्या चेन्नई सुपर किंग्सच्या नशिबी काय राहिले!

Mumbai Indians bow out of IPL 2022 : मुंबई इंडियन्स अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर झाले, जाणून घ्या चेन्नई सुपर किंग्सच्या नशिबी काय राहिले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सवर १३ धावांनी विजय मिळवला. RCB च्या ८ बाद १७३ धावांच्या प्रत्युत्तरात CSK ला ८ बाद १६० धावा करता आल्या. ग्लेन मॅक्सवेलने अनपेक्षितपणे दिलेले दोन धक्के, त्यानंतर वनिंदू हसरंगाने घेतलेली महत्त्वाची विकेट आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हर्षल पटेलने केलेली कमाल... याच्या जोरावर RCBने कमॅब केले. ३५ धावांत ३ विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलला मॅन ऑफ दी मॅच ने गौरविण्यात आले. तत्पूर्वी, महिपाल लोम्रोरच्या दमदार खेळीच्या जोरावर RCB ने समाधानकारक लक्ष्य उभे केले.  ( पाहा IPL 2022 - RCB vs CSK सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड  )

या विजयासोबत RCB ने गुणतालिकेत १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आता टॉप फोअरसाठीची चुरस अधिक वाढली आहे. CSKच्या आजच्या पराभवाने मात्र पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे IPL 2022 मधील आव्हान अधिकृतरित्या संपुष्टात आणले आहे. CSKच्या प्रत्येक विजयावर आणि स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर MI ला तुरळक संधी होती. 

या निकालानंतर गुणतालिकेती परिस्थिती

  • गुजरात टायटन्स - १० सामने , ८ विजय, १६ गुण, ०.१५८ नेट रन रेट
  • लखनौ सुपर जायंट्स - १० सामने , ७ विजय, १४ गुण, ०.३९७ नेट रन रेट
  • राजस्थान रॉयल्स - १० सामने , ६ विजय, १३ गुण, ०.३४० नेट रन रेट
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ११ सामने , ६ विजय, १२ गुण, - ०.४४४ नेट रन रेट
  • सनरायझर्स हैदराबाद - ९ सामने , ५ विजय, १० गुण, ०.४७१ नेट रन रेट
  • पंजाब किंग्स - १० सामने , ५ विजय, १० गुण, - ०.२२९ नेट रन रेट
  • दिल्ली कॅपिटल्स - ९ सामने , ४ विजय, ८ गुण,  ०.५८७ नेट रन रेट
  • कोलकाता नाईट रायडर्स  - १० सामने , ४ विजय, ८ गुण, ०.०६० नेट रन रेट
  • चेन्नई सुपर किंग्स - १० सामने , ३ विजय, ६ गुण, - ०.४३१ नेट रन रेट
  • मुंबई इंडियन्स - ९ सामने , १ विजय, २ गुण, - ०.८३६ नेट रन रेट 

 

पण, मग CSKचं काय?


गुजरात टायन्स व लखनौ सुपर जायंट्स यांचे यांचे प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्के आहे. गुजरात व लखनौ यांना प्रत्येकी १ विजय पुरेसा आहे. राजस्थान व RCB यांच्या खात्यात प्रत्येकी १२ गुण आहेत, परंतु RR एक सामना कमी खेळला आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकासाठी RRकडे एक अतिरिक्त संधी आहे. सनरायझर्स हैदराबादच्या खात्यात १० गुण असले तरी त्यांचे अजून ५ सामने शिल्लक आहेत आणि तेही या शर्यतीत आहेत. अशात पंजाब किंग्स व RCB यांना धोका आहेच.. दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांनी एखादा अनपेक्षित निकाल नोंदवून प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या संघांना धक्के दिले तर मोठे बदल होऊ शकतात. अशातच जर चेन्नईने उर्वरित चारही सामने जिंकून १४ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम राखू शकतात. त्यासाठी त्यांना उर्वरित संघांच्या कामगिरी व नेट रन रेटवर लक्ष ठेवावे लागेल. 

Web Title: IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Five time champions Mumbai Indians are the first team to be out of IPL 2022, What about CSK?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.