Join us  

Ruturaj Gaikwad IPL 2022 CSK vs GT Live Updates : Sachin Tendulkarच्या होम ग्राऊंडवर CSK ओपनर ऋतुराज गायकवाडने मोडला त्याचाच मोठा विक्रम

IPL 2022, Chennai Super Kings vs Gujarat Titans : प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन आज नव्या दमाच्या खेळाडूंसह मैदानावर उतरण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्सने घेतला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 5:15 PM

Open in App

IPL 2022, Chennai Super Kings vs Gujarat Titans : प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन आज नव्या दमाच्या खेळाडूंसह मैदानावर उतरण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्सने घेतला... गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीच्या अंतिम निकालानंतर हा निर्णय यशस्वी ठरला की फसला हे कळेल. पण, सध्यातरी ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad)  CSKच्या डावाचा मजबूत पाया उभा केलेला दिसतोय.. ऋतुराजने आयपीएलमधील ११वे अर्धशतक पूर्ण करताना GT च्या गोलंदाजांचा समाचार घेतला अन् त्याचसोबत त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा विक्रम मोडला. (पाहा IPL 2022 - CSK vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)

CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, महिषा थिक्साना, ड्वेन ब्राव्हो या प्रमुख खेळाडूंना आज विश्रांती देण्याचा निर्णय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतला. त्यांच्या जागी नारायण जगदीसन, मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी व मथिशा पथिराना यांना संधी दिली. तिसऱ्या षटकात शमीने पहिल्याच चेंडूवर कॉनवेला फटका मारण्यास भाग पाडले आणि यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने सोपा झेल टिपला. त्यानंतर ऋतुराज व मोईन यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी ३९ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. त्यात मोईनने १७ चेंडूंत २१, तर ऋतुराजने २२ चेंडूंत ३३ धावांचे योगदान दिले. साई किशोरच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याचा मोईनचा प्रयत्न फसला आणि राशिद खानने झेल टिपला. 

ऋतुराज व नारायण जगदीसन यांनी ४८ धावांची भागीदारी केली. राशिद खानने ही भागीदारी संपुष्टात आणली. ऋतुराज ४ चौकार व १ षटकारासह ५३ धावांवर बाद झाला. ऋतुराजने काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये १००० + धावांचा पल्ला ओलांडला होता. त्याने यासाठी केवळ ३१ इनिंग्ज खेळल्या आणि आयपीएल इतिहासात सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आज ऋतुराजने सचिनच्या होम ग्राऊंडवर त्याचाच विक्रम मोडला. आयपीएलमध्ये पहिल्या ३५ डावांत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये ऋतुराजने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने ३५ डावांत १२०५ धावा करताना सचिन ( ११७० धावा ) व  रिषभ पंत ( १०८५ धावा) यांचा विक्रम मोडला. 

टॅग्स :आयपीएल २०२२ऋतुराज गायकवाडसचिन तेंडुलकरचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App