Join us  

Chennai Super Kings, IPL 2022: MS Dhoni च्या संघाचा सर्वात महागडा भिडू Deepak Chahar अजूनही CSK सोबत का नाही? 'ही' एक गोष्ट ठरतेय अडथळा

वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत चहरला झाली होती दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 5:35 PM

Open in App

Deepak Chahar Fitness Update, IPL 2022: गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK) यंदा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखाली २६ मार्चला सलामीचा सामना खेळणार आहे. नवीन मोसमातील पहिल्याच सामन्यात चेन्नईचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. CSK ने गेल्या वर्षी KKR ला ३ वेळा पराभूत केले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ प्रत्येक मोसमाप्रमाणे यंदाही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पण यावेळी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका संघाला बसू शकतो. तशातच संघाचा सर्वात महागडा खेळाडू असलेल्या दीपक चहरचा फिटनेस ही गोष्ट फारच चर्चेत आहे. एका गोष्टीमुळे दीपक चहर अजूनही CSKच्या संघात दाखल झालेला नाही.

चेन्नईचा स्टार गोलंदाज दीपक चहर हा अद्याप तंदुरुस्त नसल्याचं सागितलं जात असून तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) आहे. दीपक चहरला गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या T20 सामन्यादरम्यान त्याच्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण आला होता. त्यानंतर तो षटक मध्येच सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यानंतर श्रीलंकेला टी-२० मालिकेतही खेळता आले नाही. तेव्हापासून चहर बंगळुरूमधील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करतोय, पण तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचं बोललं जातंय.

दीपक चहर पूर्णपणे तंदुरूस्त कधी होणार? असा सवाल केला जात असून त्यासाठी एक अडथळा ठरत असल्याचं दिसून येतंय. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्याने सांगितले आहे की चहरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मान्यता मिळेपर्यंत एनसीएमध्ये राहून फिटनेसवर काम करावे लागेल, ज्यामुळे तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. विश्वनाथन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, जोपर्यंत त्याला बीसीसीआयकडून फिटनेसबाबत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत तो एनसीएमध्येच राहणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२दीपक चहरमहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स
Open in App